04:18pm | Jun 22, 2020 |
सातारा: नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती व्यवसाय करणार्या बळीराजाची नवी पिढी आता शेतीउत्पादन विक्रीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसू लागली आहे. बाजारात तासंतास बसून शेतीतील माल विक्री करण्याऐवजी आता व्हॉटस् अॅपद्वारे शेतीमालाची विक्री केली जावू लागली आहे. आनेवाडी (ता.जावली) येथील दत्तात्रय फरांदे या युवा शेतकर्याने ही नवीन संकल्पना राबवली आहे. या नव्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या कडून या संकल्पनेबद्दल दत्तात्रय फरांदे यांचे कौतुक केले जात आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनने शेतीचे उत्पन्न शेतातच सडून गेले. त्यामुळे भाजीपाला व्हॉटस् अॅप ग्रुप ही संकल्पना सध्या ग्राहक व शेतकरी या दोघांसाठी फायदेशीर ठरत आहे.
एरवी टाईमपास म्हणून वापरल्या जाणार्या व्हॉटस्अॅपचा वापरही आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतो. कमी श्रमात, योग्य भाव मिळू शकतो असा विचार करत सध्या युवा शेतकरी वर्ग तंत्रज्ञानाचा वापर करून तोट्यात असणार्या शेतीव्यवसायाला नवचैतन्य देण्याचा प्रयत्न करताना दिसू लागला आहे. गावाकडे शेतीत बर्याच भाज्यांचे उत्पन्न घेतले जाते. परंतु प्रवास खर्च आणि जाणारा वेळ पाहिला असता हा व्यवसाय फारसा फायदाचा नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. बाजारभावाने आत्तापर्यंत अशा अनेक भाज्यांचा बळी घेतला आहे. सध्या टोमॅटोचा दर असाच गडगडला आहे. 10 रूपये किलो इतक्या कमी दराने टोमॅटो विकला जात आहे. यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत गावाकडच्या पाच ते सहा शेतकर्याचा एक ग्रुप तयार करून त्यांच्याकडे असलेल्या भाजीपाल्याची माहिती या ग्रुपवर फोटोसह दिली जाते.
शेतातील ताजी भाजी यामुळे शहरातील मंडळींना सहज उपलब्ध होवू लागली आहे. या ग्रुपवर भाज्यांच्या फोटोसह त्यांचा दरही दिला जातो. त्यामुळे शहरातील ज्या मंडळींना भाजी हवी आहे ती मंडळी या ग्रुपवरच हव्या असलेल्या भाजीची मागणी करतात. एक ठराविक वेळेत सातारला येवून ही भाजी त्या ग्राहकांना घरपोच केली जाते. त्यामुळे ग्राहकांनाही ताजी भाजी उपलब्ध होत आहे. तसेच आपल्याला किती भाजी विकायची आहे? आणि शेतातून किती भाजी तोडली पाहिजे? याचा अंदाज येतो त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक भाजी न तोडता हवी तेवढीच भाजी विक्रीसाठी आणली जाते.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ही सेवा उपलब्ध करून दिली जाते. त्यावेळी वेळेची बचत होवून कमीत कमी खर्चात जास्तीत परिणामकारक रित्या शेती उत्पादन विक्री केली जात आहे. या ग्रुपवर भाजी खरेदी करणार्या मंडळींना अॅड केले केले जाते. व त्यांच्या मागणीनुसार भाजी घरपोच दिली जाते. त्यामुळे वेळ वाचण्याबरोबरच ताजी भाजी उपलब्ध होवू लागली आहे.
अशा या नव्या संकल्पनेचे स्वागत केले जात आहे. आपल्या कल्पकतेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायाला फायद्यात आणण्यासाठी केली जाणारी ही युक्ती वापरणार्या युवा शेतकर्याचे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |