02:05pm | May 26, 2020 |
सातारा : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या हिंगणगाव येथील सूळ वस्तीवर असलेल्या लोकांचे येथील पोल्ट्री फार्ममुळे जगणे मुश्किल झाले आहे. एकवेळ कोरोना परवडला, पण पोल्ट्रीमुळे निर्माण झालेल्या माशा नकोत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्नपाण्यात माशा, घरात माशा त्या पोल्ट्रीमुळे हिंगणगावकरांच्या मावळल्या जगण्याच्या आशा, असे म्हणावे लागत आहे.
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले हिंगणगाव हे मोठे गाव. धोम-बलकवडी एक्सप्रेस कॅनॉलच्या पाण्यामुळे या भागात बरकत आली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुणे-मुंबईच्या लोकांसह इतर बाहेरील लोकांनी कवडीमोल किंमतीने जमिनी घेवून याठिकाणी उद्योग उभे केले आहेत. यातीलच एका बहाद्दराने गेल्या काही वर्षापूर्वी हिंगणगाव नजिक असलेल्या सूळ वस्तीत कोंबड्यांचे मोठे पोल्ट्री फार्म सुरु केले. स्थानिक पुढार्यांना हाताशी धरुन संबंधिताने आपले इप्सित साध्य केले. स्थानिकांना रोजगार देवू, अशाप्रकारच्या वल्गना केल्यामुळे स्थानिकांनी या पोल्ट्री फार्मला प्रथम विरोध केला नाही. मात्र, काही दिवसांतच पोल्ट्री फार्म पूर्ण क्षमतेने सुरु झाले आणि सूळ वस्ती, हिंगणगाव व आदर्की गावाला पोल्ट्री पासून निर्माण झालेल्या माशांच्या उपद्रवाचा भोग सुरु झाला. लोकांच्या अन्नपाण्यात, घरात, कपड्यांवर, इतकेच काय लहान मुलांच्या नाकातोंडातही या माशांनी अतिक्रमण केले. त्यामुळे लहान मुलांसह प्रौढांचेही आरोग्य धोक्यात आले. माशांच्या मुक्त संचारामुळे गटारातील व घाणीतील विषाणू या माशांच्या परिवलनामुळे घरात आले. पर्यायाने या तिन्ही गावांचे आरोग्य धोक्यात आले. गेल्या काही दिवसांपासून हिंगणगाव व आदर्की येथील नागरिकांनी या पोल्ट्री फार्मच्या विरोधात तहसिलदार, प्रांत ते अगदी जिल्हाधिकार्यांपर्यंत तक्रारी अर्ज दिले. परंतू भ्रष्ट झालेल्या अधिकार्यांनी या तक्रार अर्जांना केराची टोपली दाखवली. आज अखेर येथील नागरिकांनी अनेकदा आंदोलनाचा पवित्राही घेतला. परंतू याचा सातारा जिल्हा प्रशासनाला काहीही फरक पडला नाही.
सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. त्यामुळे हिंगणगाव पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ घरात बसूनच कोरोनाचा सामना करीत आहेत. परंतू पोल्ट्री फार्ममुळे तयार झालेल्या माशा घरात बसू देईनात आणि घरातून बाहेर पडल्यास कोरोना जगू देईना, अशी परिस्थिती येथील ग्रामस्थांची झाली आहे. मात्र, पोल्ट्री चालकाला याचे काहीही घेणे-देणे नाही. पिल्ले आणायची, त्याची कोंबडी करायची आणि ती विकून त्यातून कोट्यवधी कमवायचे, हा शिरस्ता त्या पोल्ट्री फार्म चालकाचा अव्याहतपणे सुरु आहे. परंतू पोल्ट्रीपासून निर्माण होणार्या प्रादुर्भावाची कोणतीही खबरदारी न घेतल्याने हिंगणगाव पंचक्रोशीतील लोकांचे आयुष्य कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने व्हेंटिलेटरवर यायची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाने वेळीच या प्रकरणात हस्तक्षेप करुन तोडगा न काढल्यास येत्या काही दिवसात हिंगणगाव व पंचक्रोशीतील लोक कायदा हातात घेवून ही पोल्ट्री उद्ध्वस्त करतील, याची संपूर्णपणे जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहनही ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |