12:52pm | Jul 25, 2022 |
दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 2 गडी राखून शानदार असा विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. सामन्यात नाबाद 64 धावांची दमदार खेळी आणि एक विकेट घेणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सामनावीर ठरला.
भारताची स्थिती अत्यंत बिकट झाली असताना दीपक हुडाने अक्षर पटेलसोबत मोर्चा सांभाळला. दोघांनी फटकेबाजी सुरु केली. पण तितक्यात 33 धावा करुन हुडा बाद झाला. अक्षरच्या खांद्यावर सर्व सामना येऊन ठेपला. त्याच वेळी त्याने अगदी अप्रतिम कामगिरी करत संयमी अर्धशतक ठोकलं. कारकिर्दीतील पहिलं वहिलं एकदिवसीय अर्धशतक ठोकत त्याने सामना भारताला जिंकवून दिला. सामन्यात नाबाद 64 धावांची दमदार खेळी आणि एक विकेट घेणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सामनावीर ठरला.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर त्यांनी 312 धावांचे तगडे आव्हान भारतासमोर ठेवले. भारताने अक्षर, श्रेयस आणि संजूच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य पूर्ण केले, तर सामन्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर फिरवू..
सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आज मात्र नाणेफेक जिंकूनही वेस्ट इंडीजला सामना जिंकता आला नाही. पण सामना अत्यंत चुरशीचा झाला.सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात वेस्ट इंडीजने 50 षटकात 311 धावा केल्या. विजयासाठी भारताला 50 षटकात 312 धावा करायच्या होत्या. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात भारताकडून अक्षरने केलेली फलंदाजी सर्वात उत्कृष्ट ठरली.
नाणेफेक जिंकत प्रथम वेस्ट इंडीजने फलंदाजी घेतली. फलंदाजीसाठी मैदानात आलेले वेस्ट इंडीजचे सलामीवीर शाय होप आणि कायल मायर्स यांनी दमदार अशी अर्धशतकी भागिदारी केली. 39 धावा करुन मायर्स बाद झाल्यावर एस. ब्रुक्सने देखील 35 धावा ठोकत होपला साथ दिली.त्यानंतर पूरनने होपसोबत एक मोठी भागिदारी उभारली. पूरन 74 धावा ठोकून तंबूत परतला. पण होपने फटकेबाजी सुरु ठेवली. 115 धावा करुन तो बाद झाला. पण त्याच्या शतकाच्या जोरावर विंडीजने भारतासमोर 312 धावांचे आव्हान ठेवले.
312 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार शिखर 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर गिल आणि अय्यरने डाव सावरला खरा पण 43 धावा करुन गिलही बाद झाला. त्यानंतर संजू आणि श्रेयस यांनी डाव सावरला. 63 धावा करुन अय्यर बाद झाला खरा पण संजूने झुंज कायम ठेवली. पण 54 धावा करुन तोही बाद झाला.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |