10:31pm | May 20, 2022 |
सातारा : गुरुवारी रात्री सातारा शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला. दरम्यान हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात कमालीचे तापमान वाढले असून त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसून येत होते. अंगाची लाही लाही होत असतानाच लिंबू सरबत, उसाचा रस, कोकम, कलिंगड, द्राक्षे, लस्सी, ताक याकडे नागरिकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातील उन्हाचा पारा ४४ अंश सेल्सिअस ओलांडला होता. त्यामुळे नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते.
गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत होते मात्र वाऱ्यामुळे अवकाळी पाऊस हुलकावणी देत होता. काल दिवसभर वातावरणामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. सायंकाळी आकाशामध्ये ढग निर्माण झाले मात्र पावसाने हुलकावणी दिली असतानाच रात्री अकरानंतर अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. रात्रभर सरीवर सरी कोसळू लागल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सातारा शहरासह खेड, गोडोली, कोडोली, संगमनगर, कृष्णानगर, विकासनगर, संगम माहुली, क्षेत्र माहुली, सोनगाव लिंब, महागाव, खावली, भरतगाव वाडी, खिंडवाडी, शेंद्रे, देगाव, चिंचणेर वंदन, गोजेगाव या भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मान्सून काही दिवसावर येऊन ठेवल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची नांगरट, कळवणी केली असल्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या पावसाचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला.
गुरुवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे सातारा शहरात ठिकठिकाणी गटारे तुबंल्याचे चित्र निर्माण झाले होते. आज दिवसभर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गटारे साफ करण्याची मोहीम हाती घेत याचे चित्र दिसून येत होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |