सातारा : मारामारीच्या गुन्ह्यामध्ये सुमारे चार महिन्यापासून पाहिजे असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मंगळवार पेठ पावर हाऊस सातारा येथे डिसेंबर 2020 मध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय उर्फ पिल्या राजू नलवडे रा. बोगदा, मंगळवार पेठ सातारा याने त्याच्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरामध्ये घुसून त्यास शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देऊन पट्ट्याने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी फिर्यादी वैभव जयराम कदम रा. मंगळवार पेठ सातारा यांच्या तक्रारीवरून आरोपी व त्याचे साथीदार विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हा गुन्हा घडल्यापासून आरोपी विजय राजू नलवडे हा आपले अस्तित्व लपून राहत असल्याने तो पोलिसांना मिळून येत नव्हता.
आज रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना हा आरोपी राजवाडा परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांनी राजवाडा परीसरात सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले व त्यास गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आले आहे. अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मारामारीच्या गुन्ह्यामध्ये सुमारे चार महिन्यापासून पाहिजे असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास जेरबंद केले आहे.
या आरोपीवर यापूर्वी दरोडा, जबरीचोरी, गर्दी-मारामारी, दहशत करून गंभीर दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पो.ना.अमित माने, स्वप्नील कुंभार, पो.का.मोहन पवार, पंकज मोहीते, ओमकार यादव यांनी केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |