12:46pm | Sep 15, 2021 |
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कौस्तुभ मराठे आणि मंजिरी मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं अमिष दाखवत अनेक ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे.
मराठे ज्वेलर्सकडून विविध योजनांमध्ये गुंतवलेल्या रोख रक्कम, सोने, चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या अनेक ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वलर्सचे कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे यांना पोलिसांनी अटक केली. शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. कोथरूड ) यांनी फिर्याद दिली आहे.
पुणे शहरातील मराठे ज्वेलर्समध्ये विविध सोने, चांदीच्या योजनेत पैसे गुंतवले होते. मात्र आपण गुंतवलेल्या पैशावर कोणत्याही प्रकाराचा परतावा मिळत नसल्याचे दिसून आले. त्यावर शुभांगी विष्णू कुटे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता, तपासात १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर कौस्तुभ अरविंद मराठे आणि मंजिरी कौस्तुभ मराठे या दोघांना अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याचप्रकरणी एक महिन्याआधी प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |