12:51pm | Mar 15, 2021 |
अहमदाबाद: पदार्पणाच्या सामन्यातच आक्रमक अर्धशतक झळकविणार्या यष्टीरक्षक फलंदाज इशानने असंख्य क्रिकेटप्रेमींचे मनेही जिंकले. इशान किशनने आपल्या दमदार खेळीत 32 चेंडूंमध्ये 56 धावा करताना चौकार आणि षटकारांची बरसात केली.
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसर्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण करत मागच्या पराभवाचा वचपा काढला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीही साधली. सामन्यात आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं.
इशानने संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्याने 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. सुरूवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाची हवा काढली व भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. दमदार कामगिरीसाठी किशनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पण, त्याने हा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केला.
टी-20 सामन्यात पदार्पणातच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा इशान किशन सातवा भारतीय खेळाडू ठरला. पण त्याने हा पुरस्कार आपल्या प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केला. माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आजची ही खेळी त्यांच्यासाठी होती मला स्वतःला सिद्ध करायचं होतं कारण माझ्या वडिलांसाठी तुला किमान अर्धशतक तरी झळकवावंच लागेल असं प्रशिक्षक मला म्हणाले होते. त्यामुळे मी हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो, असं किशान म्हणाला. पदार्पणाच्या सामन्यातच मिळालेला सामनावीर पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांच्या नावे समर्पित केल्यामुळे इशान किशनवर सोशल मीडियातूनही कौतुकाचा वर्षाव होतोय.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |