(प्रकाश राजेघाटगे)
पुसेगाव: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता.खटाव) येथील प.पू.श्री. सेवागिरी महाराजांचा रथोत्सवाचा कार्यक्रम यात्रेचे धार्मिक विधी पूर्वापार प्रथेनुसार आणि रूढी व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधी, पूजा कार्यक्रम हे मठाधिपती, पुजारी व विश्वस्त यांनी पार पाडले. त्यानंतर श्री सेवागिरी महारांचा फोटो व पादुका रथात ठेवण्यात आल्या. जमावबंदी असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले.
याप्रसंगी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ.सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, तलाठी गणेश बोबडे उपस्थित होते. दर्शनासाठी मंदिरात कोणालाही सोडण्यात आले नाही. दरम्यान, पुसेगावमधील बाजारपेठ अत्यावश्यक सेवा सोडून दिवसभर बंद होती.
दरम्यान, रथ व समाधी दर्शनास भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला होता. परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. तसेच पुसेगाव शहर, मंदिरास जोडले गेलेले सर्व रस्ते बॅरिगेट्स लावून पोलीस प्रशासनाने बंद केले होते. परगावातील कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला गेला नाही. गावातील नागरिकांनीही रस्त्यावर फिरकू दिले नाही.
मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी आपापल्या घरी श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची पूजा आरती करून मनोभावे स्मरण करून फेसबुक लाईव्ह व युट्युबच्या माध्यमातून नागरीकांनी सुवर्णमंडित समाधी व रथाच्या लाईव्ह दर्शनाचा आनंद लुटला. यात्रा सुरू झाल्यापासून आज अखेर सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला, फुलांनी सजविलेला रथाच्या मिरवणुकीची परंपरा चालत आली आहे. मात्र, यंदा तब्बल 72 वर्षांनी कोरोनाच्या साथीमुळे रथ मिरवणुकीसह यात्रेतही खंड पडला आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |