12:27pm | Sep 28, 2022 |
भुसावळ : 'शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेकडून झालेल्या चुकीवर भाष्य केलं. तसंच, धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असंही खडसे म्हणाले.
16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं
तसंच, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला, मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे. 16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं. असंही खडसे म्हणाले.
तसंच, 'राज्यसभेत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही मात्र विधानसभेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना हरविण्यात आलं. ही खंत पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे जनतेच्या विकास कामासाठी जोपर्यंत माझे योगदान राहील तोपर्यंत माझा कुणीही पराभव करू शकत नाही' अशी भावना पंकजा मुंडे यांच्या मनात होती. व त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं' असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. 'मात्र मोदीजी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असं जर टीकेने म्हटलं असेल तर ते दुर्दैवी असून नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याची भावना पंकजा मुंडे यांची नव्हती असंही एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे.
पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे
पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय होत असून मधल्या काळात पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य आणून देण्यामध्ये ज्यांचे योगदान राहिलं त्यांची जर उपेक्षा पक्षाच्या माध्यमातून होत असेल तर हे योग्य नसून पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, असंही खडसे म्हणाले.
सावंत यांनी सशर्त माफी मागण्याऐवजी बिनशर्त माफी मागावी
'शिंदे गटाच्या मंत्रिमंडळातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत दुर्दैवी वक्तव्य केले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतरांच्या भावना दुखावल्या असून आरक्षण मागणं चूक आहे का असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान सावंत यांनी सशर्त माफी मागण्याऐवजी बिनशर्त माफी मागावी व पुढे असं वक्तव्य करणार नाही, असं तानाजी सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |