02:51pm | Jul 04, 2022 |
पुसेगाव (प्रतिनिधी) : टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले.... 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'श्री सेवागिरीं'चा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी तीर्थक्षेत्र पुसेगाव येथून प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे आज पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी पुसेगावात मोठ्या संख्येने वारकरी, भक्तगण, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक दाखल झाले होते. त्यामुळे येरळाकाठ वैष्णवांच्या उपस्थितीनं गजबजून गेला होता.
श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी दिंडी सोहळ्याचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. आज सकाळी ९.०० वाजता श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज व श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे, श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे आणि पालखी दिंडी रथाचे मंत्रघोषात विधीवत पूजन केले. याप्रसंगी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, माजी चेअमन अँड. विजयराव जाधव, जगनशेठ जाधव, पालखी सोहळा प्रमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती
मंदिरातून सकाळी ९.३० वाजता दिंडीचे प्रस्थान टाळ मृदुंगाच्या निनादात झाले. श्री सेवागिरी महाराजांची मूर्ती विराजमान असलेला आणि फुलांच्या माळांनी सजविलेला दिंडी रथ मंदिरातून बाजारपेठेमार्गे एसटी बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी फुगड्या, गोल रिंगण, पारंपारिक खेळ सादर केले. शाळांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, मसाला दूध, खिचडी व नाश्त्याची सोय केली होती. करोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे पायी दिंडी सोहळा होऊ न शकल्यामुळे उदास झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रस्थान सोहळ्यात सहभागी होत असल्याचा आनंद दिसत होता.
दरम्यान, दिंडीचा पहिला मुक्काम महिमानगड येथे होणार आहे, यानंतर रविवार ३ जुलै लोधावडे फाटा, सोमवार ४ जुलै म्हसवड, मंगळवार ५ जुलै पिलीव, बुधवार ६ जुलै भाळवणी, गुरुवार ७ जुलै उपरी, शुक्रवार ८ जुलै वाखरी, शनिवार ९ जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. रविवार १० जुलैला आषाढी एकादशी आहे. सोमवार ११ जुलै रोजी दिंडीचे परत पुसेगावकडे प्रस्थान होईल. पालखी सोहळ्यात श्री सेवागिरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाईंची साकारलेली पारंपारिक वेशभूषा पालखी दिंडीचे आकर्षण ठरली. तर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत हा सोहळा अधिक रंगतदार केला.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |