08:02pm | Oct 13, 2021 |
सातारा : महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महिला यांना स्वसंरक्षण करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा येथे महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचा समारोप देसाई यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले, समाजात विकृत मनोवृत्तींच्या लोकांमुळे विद्यार्थिंनीना,महिलांना त्रास होत असतो. या अपप्रवृत्तींना धाक बसविण्यासाठी महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे मदत होणार आहे. पोलीस विभागातील महिला प्रशिक्षणार्थीकडून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिंनींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. हा प्रकल्प सातारा जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व खेड्यांत शाळा महाविद्यालयांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
सातारा शहरातील आठ शाळांतील 521 विद्यार्थीनींनी या सराव शिबीरामध्ये सहभाग घेतला. प्रशिक्षण शिबीरातील सहभागी विद्यार्थींनींना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सातारा शहरातील विद्यालयातील विद्यार्थिंनी व पालक उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |