08:50pm | Aug 05, 2021 |
कोरेगाव : गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव वय ३५, याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक शिवार रस्त्यावर निर्घुणपणे खून करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा कयास पोलिसांचा असून, त्याचदृष्टीने तपासाची यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. घटनास्थळी उच्चपदस्थ पोलीस अधिकार्यांनी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरुन व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगेश जाधव हा गोगावलेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असून, सातारा जिल्हा नाथ समाजाचा पदाधिकारी होता. ग्रामपंचायत निवडणुकीत तो विजयी झाला होता. सक्रीय सदस्य म्हणून तो ग्रामपंचायतीत दैनंदिन कामकाज पाहत होता.
उदरनिर्वाहासाठी तो कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयामार्फत संपूर्ण तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबविणार्या पथकाच्या खाजगी टाटा सुमो वाहनावर चालक म्हणून काम गेल्या एक वर्षापासून काम करत होता.
बुधवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास तो कोरेगाव येथे कामावर जाण्यासाठी गोगावलेवाडी येथून निघाला. तसे तो घरात सांगून गेला होता. सायंकाळी तो घरी परत आला नाही, म्हणून आई व पत्नी काळजीत होत्या. नेहमी वेळेत घरी परतणारा, आज उशिरापर्यंत घरी कसा आला नाही, ही बाब खटकली. त्यामुळे त्यांनी मंगेश याच्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही क्रमांक स्वीच ऑफ येत होते. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी देखील मंगेश आमच्याकडे आला नाही, असे सांगितले. त्यामुळे घरातील लोकांमध्ये काळजी वाढली.
गुरुवार दि. ५ ऑगस्ट रोजी आई शोभा हा गावातील शेजारीच असलेल्या यश बेबले याला बरोबर घेऊन सकाळी ७.३० च्या सुमारास कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात गेल्या, तेथे सुमो वाहनाचे मालक व अन्य कर्मचार्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी ५ वाजेपर्यंत मंगेश हा रुग्णालयातच होता, तेथून तो कोठे गेला, हे माहीत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्या कोरेगाव पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना धोम डाव्या कालव्यानजिक शिवाराच्या रस्त्यावर नेले. तेथे रस्त्याकडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला युवकाची माहिती दिली व त्याचा चेहरा दाखविला, तो मंगेश असल्याचे आई शोभा जाधव यांनी ओळखले. अज्ञात व्यक्तीने मंगेश याचा खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर शोभा गणपत जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलीस नाईक अमोल सपकाळ तपास करत आहेत.
पोलिसांची तपास पथके रवाना
मंगेश जाधव याचा खून हा वादातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, संतोष साळुंखे, उपनिरीक्षक विशाल कदम व रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांना तपासकामी मार्गदर्शन केले. पोलिसांनी चारही बाजूने तपास करण्यास वेगवेगळ्या पथकांद्वारे सुरुवात केली आहे. मंगेश याच्याशी ज्यांचे वाद होते, त्यांची चौकशी देखील केली जात आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |