01:21pm | Jul 07, 2021 |
हंदवारा (उत्तर काश्मीर) : सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत देशातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका मोठ्या दहशदवाद्याला ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. उत्तर कश्मीरच्या हंदवाडा येथे चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेकी संघटनेचा सर्वात जुना आणि सर्वोच्च कमांडर असलेला मेहराजउद्दीन हलवाई उर्फ उबैद याला सुरक्षा दलांनी ठार केले आहे. हा मेहराजउद्दीन अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील असल्याची माहिती काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली. सुरक्षा दलाचे हे एक मोठे यश असल्याचे असल्याचे त्यांनी म्हटले.
उत्तर काश्मीरच्या हंदवारा येथील क्रालगुंडमधील पाझीपोरा-रेनान भागात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन केले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाईद २०११ मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता.
“मारलेला अतिरेकी मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद २०११ साली दहशतवादी गटात सामील झाला होता. त्याने कॉप्युटर अॅप्लिकेशनमध्ये डिप्लोमादेखील केला होता. सोशल मीडियाचा दुरुपयोग आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या संवादाच्या प्रणालीसाठी जबाबदार होता असे” काश्मीर झोन पोलिसांनी ट्वीट केले आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या नोंदींनुसार मेहराजुद्दीन हलवाई हा अ ++ वर्गीकृत दहशतवादी होता. तो दहशतवादी गटात तरुणांची भरती करत होता. चकमकीच्या ठिकाणाहून बेकायदेशीर साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळे, औषधे जप्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हंदवाडा पोलिसांनी ३२ आरआर आणि सीआरपीएफच्या ९२ बटालियनच्या जवानांनी मेहराजुद्दीन लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. मेहराजउद्दीन लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचताच त्याने तिथे ठेवलेला एके-४७ उचलली आणि गोळीबार करत लपून बसला. त्या ठिकाणाला सुरक्षा दलाने घेराव घातला होता. त्याला शरण जाण्यास सांगितले पण त्याने सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार चालूच ठेवला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |