10:58pm | Sep 28, 2020 |
सातारा : जिल्ह्यात सोमवारी 747 बाधित निष्पन्न झाले, तर 17 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच 983 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 805 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सोमवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 983 नागरिकांना डिस्चार्ज मिळाल्याने सातारकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या 983 कोरोनामुक्तांमुळे जिल्ह्यातील मुक्तांची संख्या 26 हजारांचा आकडा पार करीत 26 हजार 497 वर पोहोचली आहे. तसेच 747 बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 36 हजारांचा टप्पा ओलांडत 36 हजार 628 वर पोहोचला आहे. याचबरोबर 17 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1096 वर पोहोचली आहे, तर 805 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
17 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये मल्हार पेठ सातारा येथील 82 वर्षीय महिला, गोवे ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, देगाव फाटा सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष, नाझरे ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कोपर्डे हवेली ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष, घोलपवाडी ता. कराड येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 62 वर्षीय महिला, बोबडेवाडी ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, तांबवे ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, कोयना वसाहत ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, कोपराळे ता. खटाव येथील 39 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, वाई येथील 60 वर्षीय पुरुष, फुलेनगर वाई येथील 60 वर्षीय महिला तसेच उशिरा कळविलेले वाई येथील 62 वर्षीय पुरुष, असे एकूण 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
805 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 70, कराड 19, उपजिल्हा रुग्णालय फलटण 50, कोरेगाव 49, वाई 83, खंडाळा 79, रायगांव 97, पानमळेवाडी 46, मायणी 28, महाबळेश्वर 50, पाटण 10, दहिवडी 42, खावली 17, तळमावले 31 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 134 असे एकूण 805 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |