02:32pm | Jun 24, 2020 |
सोऊल: किम जोंग उन यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या बैठकीत हजेरी लावली. या बैठकीत दक्षिण कोरियाविरोधातील लष्करी कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर कोरियातील अधिकृत वृत्त संस्था ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मात्र, हा निर्णय का घेण्यात आला याबाबतचे नेमके कारण समोर आले नाही. दक्षिण कोरियन सरकारने अधिकारी योह संग की यांनी सांगितले की, उत्तर कोरियाच्या हालचालींवर आमचे लक्ष असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला. मागील दिवसांपासून उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील तणाव वाढत आहे. उत्तर कोरियातील बंडखोरांना आश्रय दिलेल्या दक्षिण कोरियाविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली होती. मात्र, उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी या कारवाईला स्थगिती दिली आहे. ‘फार ईस्टर्न स्टडीज्’चे तज्ञ किम डोंग युब यांनी सांगितले की , उत्तर कोरिया दक्षिण कोरियाकडून काही कारवाई होईल याची प्रतिक्षा करत असेल. उत्तर कोरिया स्वत:ला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनी सांगितले. किम डोंग युब हे दक्षिण कोरियाचे माजी सैन्य अधिकारी आहेत. दोन्ही देशातील लष्करी चर्चेत त्यांनी सहभाग घेतला होता. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाविरोधातील कारवाईला स्थगिती दिली आहे. ही कारवाई रद्द केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, मागील आठवड्यात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाला थेट युद्धाची धमकी दिल्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते उडवून दिले. कराराद्वारे लष्करविहीन केलेल्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश करण्याची धमकीही उत्तर कोरियाने केल्यामुळे दक्षिण आणि उत्तर कोरिया या शेजारील देशांमधील संबंध पुन्हा एकदा विकोपाला गेले असल्याचे चित्र होते. गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सातत्याने वाद झडत असून, कारवाईची धमकी उत्तर कोरियाकडून वारंवार देण्यात येत होती. सीमेच्या परिसरात सामरिक हालचाली आणि कथित दुष्प्रचार करणे दक्षिण कोरियाने थांबविलेले नाही, असा उत्तर कोरियाचा आरोप आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |