03:17pm | Jun 22, 2020 |
पाटणा : पाकिस्तान, चीन नंतर आता आठमुठेपणाची भूमिका घेवू लागला आहे. नेपाळ सरकारनं पूर्व चम्पारणच्या ढाका उपविभागातील लालबाकेया नदीवर सुरू असलेलं धरण दुरुस्तीच्या कामाला हरकत घेतलीय. नेपाळकडून गंडक धरण दुरुस्तीच्या कामाला परवानगी नाकारली जातेय, असं बिहारचे जल संधारण मंत्री संजय कुमार झा यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, लालबाकेया नदी ‘नो मॅन्स लँड’चा भाग आहे.
लालबाकेय नदीवरच्या धरणासोबतच नेपाळकडून इतर ठिकाणच्या कामांनाही रोखण्यात येतंय. पहिल्यांदाच भारतीय अधिकार्यांना अशा पद्धतीच्या समस्येचा सामना करावा लागतोय.
धरणाच्या दुरुस्तीसाठी सामानाचा पुरवठा करणंही अधिकार्यांना कठीण होऊन बसलंय. इंजिनियर्सला कामासाठी सामन पोहचू शकलं नाही तर दुरुस्तीच्या कामाला फटका बसेल. तसंच नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गंडक नदीच्या पाण्यात वाढ झाली तर एखादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. गंडक धरणाला 36 दरवाजे आहेत यातील 18 दरवाजे नेपाळमध्ये आहेत. भारतीय बाजुला असलेल्या 17 दरवाज्यांपर्यंत दुरुस्तीचं कामकाज पूर्ण झालंय. परंतु, नेपाळच्या बाजुला असलेल्या 18 दरवाजांचं मात्र काम अद्याप झालेलं नाही. नेपाळकडून या धरणाच्या दुरुस्तीचं सामानालाही परवानगी नाकारण्यात येतेय.
उल्लेखनीय म्हणजे लालाबकेया नदीच्या पश्चिम भागातील तटबंदीला 2017 साली आलेल्या जलप्रलयामुळे मोठी हानी पोहचली होती. त्याच्या दुरुस्तीचंही काम सुरू आहे. याआधी, अशी परिस्थिती कधी उद्भवलीच तर भारतीय आणि नेपाळी अधिकारी एकत्र बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढत असतं. परंतु, यावेळी मात्र हा प्रश्न गंभीर रुप घेत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
पाटबंधारे विभागाचे अभियंते बबन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सरकारनं जवळपास पाचशे मीटर धरणाच्या जमिनीवर आक्षेप व्यक्त केलाय तसंच कामही रोखण्यात आलंय. या धरणामुळे पूर्व जम्पारण जिल्ह्यातील ढाका आणि पताहीमध्ये पुराचा धोका टाळता येऊ शकतो. नेपाळच्या या आडमुठेपणामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |