09:41pm | Jan 16, 2022 |
कराड : मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झारखंड राज्यातील हैदर हजारीबाग भागातील पारसनाथ आवधेश कुमार यादव याच्यासह त्याचा कामगार दिलीप कुमार हे दोघेजण कराडातील तुषार कदम यांच्या पोकलॅन मशीनवर कामास आहेत. सध्या हे मशिन भारत गॅसच्या सीएनजी गॅस पाईपलाईन कामासाठी वापरण्यात येत असून मालखेड गावच्या हद्दीत खुदाईचे काम सुरू आहे. गुरूवारी रात्री काम संपल्यानंतर पारसनाथ व त्याचा कामगार दिलीप कुमार हे पोकलॅन मशिनमध्येच झोपी गेले. शुक्रवारी पहाटे अज्ञात तिघांनी त्यांना उठवले. संबंधितांच्या हाताच चाकू व कोयता होता. कोयत्याने हात तोडण्याची धमकी देऊन त्या तिघांनी पारसनाथ याच्याकडील पैसे, अंगठी, मोबाईल तसेच दिलीप कुमार याच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ते तिघेजण तेथुन पसार झाले.
चोरट्यानी तोंड रुमालाने बांधल्यामुळे पारसनाथ व दिलीप कुमार यांना त्यांचा चेहरा पाहता आला नाही. घटनेनंतर पारसनाथ याने त्याच्या कामाचे ठेकेदार आत्माराम नलवडे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन तीन अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |