12:47pm | Jun 22, 2020 |
जम्मू : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून करण्यात येणार्या गोळीबारात राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये एक भारतीय जवान जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरच्या कठुआ, राजौरी आणि पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सेनेकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही 14 जून रोजी पुँछ जिल्ह्यातील सीमेवर गोळीबारातही एक जवान शहीद झाला होता.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुँछ जिल्ह्यातील कृष्णा खोरे सेक्टर आणि राजौरीच्या नौशेरा सेक्टरच्या नियंत्रण रेषेजवळ तसंच कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अद्यापही मोर्टार डागले जात आहेत तसंच गोळीबारही सुरूच आहे. याच गोळीबारात नौशेरा सेक्टरमध्ये सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात सीमेजवळील चौकीवर तैनात सेनेचा एक जवान गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यानं प्राण सोडले.
या महिन्यात राजौरी आणि पुँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी गोळीबारात शहीद झालेला हा चौथा लष्करी जवान आहे. पाकिस्ताननं राजौरी जिल्ह्यात 4 आणि 10 जून रोजी गोळीबार केला होता. यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. 14 जून रोजी पुँछ जिल्ह्यात सीमेवर झालेल्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला होता. 10 जूनपर्यंत पाकिस्तानकडून 2027 हून अधिक वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.
संरक्षण प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी जवळपास साडे तीन वाजता पाकिस्तानी सैनिकांकडून पुँछ जिल्ह्यातील कृष्णा खोरे सेक्टरच्या नियंत्रण रेषेजवळ छोट्या हत्यारांच्या सहाय्यानं गोळीबार करण्यात आला, मोर्टार डागले गेले. यानंतर सकाळी जवळपास साडे पाच वाजता पाकिस्तानी सेनेनं कोणत्याही उत्तेजनाशिवाय राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यापूर्वी कठुआ जिल्ह्यातील हीरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तान रेंजर्सनं रात्री एक वाजता मोठा गोळीबार केला. याला बीएसएफ जवानांकडून प्रत्यूत्तर देण्यात आलं. ही चकमक जवळपास तीन तासांपर्यंत सुरू होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |