05:53pm | Dec 26, 2020 |
सातारा : वाई, ता. वाई येथील एका लॉजमध्ये अनैतिक कृत्ये चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी तिघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी आढळून आलेल्या दोन पीडित महिलांना सुधारगृहात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना शहरात वेश्यागमनाकरिता मुली व महिला आणून पुरविल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असताना दि. २५ डिसेंबर रोजी आनंदराव खोबरे यांना माहिती मिळाली, की वाई शहरातील एका लॉजवर मुली पुरवल्या जातात. मिळालेल्या माहितीच्या आधारावर तात्काळ एक पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला असता लॉज मॅनेजर बसवराज मनिक मान्याळ (वय ४३, रा. बोधेवाडी, ता. कोरेगाव) याने ग्राहकांना वेश्यागमनाकरिता दोन महिला आणून ठेवल्याचे दिसून आले. या अनुषंगाने लॉज मॅनेजर बसवराज मनिक मान्याळला तात्काळ अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी लॉज मालक, लॉज मॅनेजर बसराज मनिक मान्याळ आणि महिला पुरविणारा नवनाथ उर्फ पप्या अनिल जाधव (वय २७, रा. बावधन, ता. वाई) या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, महिला पोलीस नाईक दीपिका निकम, सोनाली माने यांनी सहभाग घेतला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |