07:09pm | Dec 08, 2021 |
कन्नूर : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला आहे.
बिपीन रावत हे आज सकाळी ८.४७ वाजता दिल्ली विमानतळ येथून विशेष विमानाने सुलूर येथे पोहचले होते. तिथे ११.३४ वाजता पोहचल्यानंतर एमआय १७ या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ते वेलिंग्टनकडे निघाले. वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. त्यात ते लेक्चर देणार होते. मात्र, ११.४८ वाजता सुलूर येथून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त आले. या दुर्घटनेत रावत हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, काही वेळापूर्वीच त्यांच्या निधनाचे वृत्त आले आहे.
भारतीय हवाई दलाने अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश आहे, असे हवाईदलाने नमूद केले आहे. दुर्घटनेत शौर्यचक्र विजेते भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले. हेेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण होते त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, बिपीन रावत यांच्या निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. २०२० मध्ये रावत यांच्याकडे संरक्षण दल प्रमुखपदाची धुरा देण्यात आली होती. ते देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) ठरले. संरक्षण दल प्रमुख म्हणून आणि त्याआधी लष्करप्रमुखपदावर असताना रावत यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची ऑपरेशन्स झाली. रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला असून या दुर्घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले गेले आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |