02:13pm | Sep 27, 2021 |
पुसेगाव : कोल्हापूर येथे होणाऱ्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खटाव तालुक्यातील नायकाचीवाडी येथील सुपुत्र व अहमदाबाद येथील राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मदन गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे संयोजक डॉ.दत्तात्रेय डुंबरे यांनी त्यांचे नाव घोषित केले. विश्वात्मक संत साहित्य परिषद पुणे यांच्याकडून अखिल विश्वातील संतपरंपरेचा अभ्यास व संशोधन केले जाते. कोल्हापूर येथे अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण चार उमेदवारांकडून गोसावी यांच्या नावाची परिषदेकडे शिफारस करण्यात आली होती.
लोककलेचा अभ्यासक डॉ.प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये गोसावी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. कोरोना काळात संतसाहित्याने दिलेली मनशांती, या विषयावर या संमेलनामध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय संतसाहित्याची संशोधन केंद्रे जगभर सुरू व्हावीत यासाठी विशेष कृतियोजना आखण्यात येणार असल्याची माहिती डॉ.विनय देव यांनी दिली.
गोसावी यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायाधीशपदावर काम केले असून मंत्रालयात विधी आणि न्याय खात्याचे सहसचिव म्हणूनही ते कार्यरत होते. ते सध्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या व्यवसायिक कामासोबतच त्यांनी राज्यभर कीर्तन प्रवचनातून जनजागृती केली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |