03:59pm | Jun 30, 2022 |
मणिपूर : मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 टेरिटोरियल आर्मी छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात सापडली आहे. या अपघातानंतर डझनभर जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 13 जवानांना वाचवण्यात यश आले आहे. त्याच वेळी, 30-40 पेक्षा जास्त अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.
जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. दरड कोसळल्याने इझाई नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. ही नदी तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून वाहते. वृत्तानुसार, काही नागरिक देखील ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे बचाव मोहिमेत अडचणी येत आहेत. लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले आहे. आजूबाजूचा परिसर लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू
ढिगाऱ्यांमुळे इजाई नदी पाण्याचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी पाणी साचल्याने धरण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तो फुटला तर सखल भागात अधिक परिणाम होऊ शकतो. जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी 107 टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यानंतर गुरुवारी सकाळी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |