03:47pm | Sep 12, 2020 |
कराड : सामाजिक कार्यांमध्ये कराड तालुक्यात अग्रेसर असणारा श्री मळाई ग्रुप, शेतीमित्र अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली व डॉ.स्वाती थोरात यांचे नेतृत्वाखाली मोफत वैद्यकीय सल्ला देण्यासाठी श्री मळाई कोरोना हेल्पलाइन सुरू करत आहे.
सध्याच्या कोरोना महामारीमध्ये पेशंट व बेड यांचे प्रमाण व्यस्त आहे. रुग्ण आणि जनता सैरभैर झाली आहेत. शिंक आली तरी लोक घाबरत आहेत. अज्ञान, भीती, अविश्वास आणि अपुरे ज्ञान या गोष्टींमुळे रुग्ण गंभीर होत आहेत. समाजामध्ये अनागोंदी माजली आहे. शासकीय यंत्रणा आम्ही अजूनही खूप चांगले आहोत हे दर्शविण्यात गुंतले आहेत. रुग्ण ऑक्सीजन, बेडच्या प्रतीक्षेत घरीच मृत्यूशी झुंज देत आहेत. अशाच परिस्थितीत रुग्णांना धीर देऊन योग्य तपासणी, वेळेवर सुयोग्य उपचार मिळाल्यास होम आयसोलेशन द्वारे 50 ते 60 टक्के रुग्ण घरीच बरे होऊ शकतील. तसेच सिस्टिमवरचा बोजा कमी करता येऊ शकेल.
हेल्पलाईन द्वारे रुग्णांना दिवसातून दोन वेळेस मोफत व्हिडिओकॉलद्वारे वैद्यकीय सल्ला, सर्व औषधे, पल्स, ऑक्सी मिटर, थर्मामीटर, सँनिटायझर, होम सँनिटेशन या सर्व गोष्टी नाममात्र दरात मळाई ग्रुप मार्फत उपलब्ध होतील. व्हिडिओ कॉल द्वारे तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत पेशंटवर निगराणी ठेवून ऑक्सिजनची कमतरता आढळल्यास ताबडतोब ऑक्सिजन पुरवठा करून रुग्णास ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाईल.
समाजातील सर्व गरीब गरजू रुग्णांसाठी ही सेवा श्री मळाई ग्रुप मार्फत मोफत सुरू आहे. या मोफत सेवेचा लाभ सर्व गरजूंनी घ्यावा असे आवाहन श्री मळाई ग्रुपचे सर्वेसर्वा, शेतीमित्र श्री अशोकराव थोरात यांनी केले.
अमृत हॉस्पिटल मलकापूरच्या डॉ.स्वाती थोरात, संजीवनी हॉस्पिटल कोल्हापूरच्या डॉ.स्वाती पाटील, दुशेरे पोलीस पाटील संदीप जाधव, नगरसेवक मलकापूर, श्री मळाईदेवी नागरी पतसंस्था व संपूर्ण मळाई ग्रुप यासाठी सहकार्य करत आहे.
समारंभास मलकापूरचे नगरसेवक अजित थोरात, संदीप जाधव, अण्णा काशीद,
मळाईदेवी पतसंस्थेच्या चेअरमन अरुणादेवी पाटील, आदर्श ज्युनियर कॉलेज मलकापूरचे प्राचार्य एस.वाय.गाडे, उपप्राचार्य एस.बी.शिर्के मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |