सातारा : महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्यावतीने आज दि. 28 रोजी विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ सातारा जिल्ह्याच्यावतीने दि. 28 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील केंद्रप्रमुखांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांनी राज्य शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात केंद्रप्रमुख संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करणारी पर्यवेक्षीय यंत्रणा असलेल्या केंद्रप्रमुख पदाची निर्मिती 1995 मध्ये करण्यात आली होती. परंतू मधल्या काळात काही न्याय्य मागण्या मान्य करण्यासाठी संघटनेने शासनाकडे यापूर्वी निवेदने दिली होती. परंतू निवेदने देवूनही शासनाकडून त्या मागण्या अद्यापही सोडविण्यात आलेल्या नाहीत. या मागण्यांमध्ये केंद्रप्रमुख वर्ग-2 चा लाभ देणे, केंद्रप्रमुखांना बंद असलेला प्रवास भत्ता इतर पात्र कर्मचार्यांप्रमाणे सन 2010 पासून सुधारित दराने लागू करणे, केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा भरणे, केंद्र शाळांची पुनर्रचना करणे, शिक्षण विस्ताराधिकारी श्रेणी दोन पदोन्नतीसाठी फक्त केंद्रप्रमुखांचा विचार व्हावा, केंद्रप्रमुखांना वेतनवाढ देणे, अभावित केंद्रप्रमुखांना कायम करणे अशा मागण्या महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने केलेल्या आहेत.
या मागण्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी आज दि. 28 रोजी संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती केंद्रप्रमुख संघातर्फे देण्यात आली. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे राज्य उपाध्यक्ष दारासिंग निकाळजे, कार्याध्यक्ष श्रीनिवास पवार, उपाध्यक्ष अरविंद दळवी, जिल्हाध्यक्ष रमेश लोटेकर यांच्यासह पदाधिकार्यांनी सहभाग घेतला होता.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |