07:40pm | Apr 19, 2022 |
कोरेगाव : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे गावाच्या यात्रेत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रामदेवतेच्या पालखीदरम्यान सासनकाठीला 11 के.व्ही क्षमतेच्या विजेचा धक्का लागल्यानं काठीचा मानकरी असलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. महेश बाळासाहेब माने असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते.
भोसे गावात मंगळवारी ग्रामदैवत ज्योतिलिंग यात्रेत देवाची पालखी आणि मानाची सासनकाठीची ग्रामप्रदक्षिणा होती. सासनकाठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने हे होते. त्यांनी ही काठी आकर्षकरित्या सजवून त्यावर वीजेच्या माळादेखील लावल्या होत्या. सकाळी ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली त्यावेळी महावितरणच्या ११ के.व्ही. क्षमतेच्या वीजवाहिनीचा काठीला धक्का लागला. वीजप्रवाह काठीत उतरला आणि महेश माने यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
माने कुटुंबातील महेश हा एकुलता एक मुलगा होता. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांचेही दोन वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. महेश अविवाहीत असून त्यांच्या निधनाने यात्रेचा सगळा उत्साहच मावळला असून या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |