08:44pm | May 26, 2023 |
सातारा : सातारा पालिकेकडून शहराला नियोजनानुसार पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जात आहे. असे असताना हे पाणी नेमकं जातंय कुठं? नागरिकांना पाणी टंचाई भासतेयच कशी? या प्रश्नांची उकल करण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील बोगस नळकनेक्शची शोधमोहीम हाती घेतली आहे. शहरातील माची पेठ, मंगळवार पेठ या भागात सव्हेर्चे काम सुरू झाले असून, बोगस नळधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळा सुरू होतात पाण्याचा वापर व मागणी दोन्हीत वाढ होते. पालिकेकडून ठरलेल्या वेळापत्रकानुसार शहराला पाणीपुरवठा केला जात आहे मात्र जलवाहिन्यांची दुरुस्ती फिल्टर बेल्ट स्वच्छता अशा कामांमुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते त्यामुळे काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती या सर्व समस्या आता संपुष्टात आल्या असून शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरविले जात आहे तरी देखील काही भागात अद्यापही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवत आहे हे तपासण्यासाठी पालिकेने बोगस नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिथे कुठे असेल कनेक्शन आढळून येतील अशा नळधारकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. शिवाय अनधिकृत नळ धारकांचा आकडा देखील समोर येणार आहे.
अनेकांच्या नळांना मोटारी
सातारा शहराचा पाणीपुरठा काही दिवसांपूर्वी विस्कळीत झाला होता. नळाला कधी कमी दाबाने पाणी येत होते तर कधी पाणीच येत नव्हते. आता पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला तरी काही नळधारकांकडून नळांना मोटारी लावण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे काही भागात कृत्रीम टंचाई निर्माण होत आहे. अशा नळधारकांवर पालिकेने कारवाई करुन मोटारी जप्त कराव्यात, अशी मागणी होत आहे.ठराविक भागात पाण्याचे भरमसाठ टँकर
ज्या भागात पाणी येत नाही, अशा भागात पालिकेकडून पाणी टँकर पुरविले जातात. शहराच्या पश्चिम भागातील एका अपार्टमेंटला तर ८० हून अधिक टँकरच्या खेपा देण्यात आल्या. तरी देखील येथील नागरिकांकडून पाण्यासाठी पालिकेवर खापर फोडण्यात आले.शहराची लोकसंख्या : १,८४,५०४
मिळकती (हद्दवाढीसह) : ७२,०००
अधिकृत नळधारक : १६,०००
अनधिकृत : ?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |