सातारा : प्रतापसिंह नगरातील कांतीलाल कांबळे नावाची व्यक्ती आमच्यावर दबाव आणून दुकान हडपण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही या प्रकरणाची कोणतीच दखल घेतली जात नाही. आम्हाला पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून, त्यांची चौकशी करावी. तसेच या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे सोपवावा. अन्यथा आमचे कुटुंब सामूहिक आत्महत्या करेल, असा इशारा महेश शिवदास यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
सातारा येथे मंगळवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, वाढे फाटा येथे काही दिवसांपूर्वी दुकानांना आग लागली. या आगीत आमचे दुकान खाक झाले. जागेच्या मूळ मालकासह आमचा कायमस्वरूपी भाडे करार झालेला आहे. या करारानुसार आम्ही १९९८ पासून येथे व्यवसाय करत आहोत. कांतीलाल कांबळे नावाच्या व्यक्तीने आमच्या बंधूच्या व्यसनाचा गैरफायदा घेत चुकीच्या पद्धतीने २५ वर्षांचा भाडेकरार केला. शिवाय वहिनींच्या खोट्या सह्या करून आठ अ उताऱ्यावर नाव देखील लावून घेतले. काही दिवसांपूर्वी कांतीलाल याने काही महिलांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला देखील केला. या सर्व प्रकरणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या माझ्या छोट्या मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील त्या महिलांकडून करण्यात आला. सीसीटीव्ही चोरून नेण्यात आले. दुकानाच्या दुरुस्तीसाठी आणलेले पत्रे देखील लंपास करण्यात आले. एका महिलेने तर स्वतःच स्वतःचे कपडे काढत आमच्यावर खोटे आरोप केले. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये स्पष्ट चित्रित झालेला आहे.
या घटनेनंतर आम्ही १८ जानेवारीला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली; परंतु पोलिसांकडून या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल घेतली गेली नाही. उलट काही राजकारणी लोकांच्या मदतीने आमच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. हा सर्व खटाटोप दहा लाखांच्या खंडणीसाठी सुरू असल्याचा आरोप महेश शिवदास यांनी केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आम्हाला संशय असून तेच संशयित आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे हा तपास एलसीबीकडे सोपवावा, आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, तातडीने न्याय न मिळाल्यास आमचे कुटुंब सामुदायिक आत्महत्या करेल, असा इशारा शिवदास यांनी दिला.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |