08:32pm | Jan 23, 2021 |
सातारा : चालू सन 2020-2021 चे गाळप हंगामाकरिता कारखान्याकडे उपलब्ध असलेला ऊस विचारात घेता या हंगामात 6.50 लक्ष मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कमित कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त ऊस गाळप करून अत्युत्तम साखर उतारा प्राप्त करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. या हंगामात आत्तापर्यंत 3,26,390 मे.टन ऊस गाळप झाले असून दैनिक साखर उतारा 13.52% व सरासरी साखर उतारा 11.87% इतका आहे. स्व.भाऊसाहेब महाराज यांचे आदर्श विचार डोळयासमोर ठेऊन सभासद शेतकरी यांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेत संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण अवलंबवून साखर उद्योग अडचणीत असतानासुध्दा कारखान्याचे संचालक मंडळ कुशलतेने काम करीत आहे.
ऊस उत्पादक शेतकर्यांनी घेतलेल्या पीक कर्जावरील व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही याकरिता अजिंक्यतारा कारखान्याने मागील हंगामाप्रमाणे याही चालू गाळप हंगामात ऊसाचे दर 10 दिवसांचे पेमेंट करीत आहे. महाराष्ट्र राज्याच्या साखर उद्योगामध्ये अशा पध्दतीने दर 10 दिवसांनी ऊस पेमेंट आदा करणारा अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे. केंद्र शासनाचे एफ.आर.पी. सूत्रानुसार चालू गळीत हंगामाकरिता एफ.आर.पी. प्रति मे.टन रूपये 3043.00 इतकी असून या हंगामात गाळपास येणार्या ऊसास पहिली उचल प्रति मे.टन रूपये 2600.00 प्रमाणे ऊस पेमेंट शेतकर्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येत आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम दि. 4 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालेला असून दि.20.1.2021 अखेर पर्यंत एकूण 80 दिवसांमध्ये एकूण 3,17,747.211 मे.टन गाळप केले असून पहिली उचल प्रति मे.टन रूपये 2600.00 प्रमाणे दि. 20.1.2021 अखेरपर्यंत एकूण रूपये 82 कोटी 61 लक्ष 42 हजार 741 रकमेचे ऊस बिल पेमेंट संबंधीत शेतकर्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आलेले आहेत.
कारखान्याची वाटचाल ही सदैव प्रगतीच्या दिशेने असल्याने व कारखान्याचे संचालक मंडळाचे सभासदाभिमुख धोरण असल्यामुळे याचा लाभ ऊस उत्पादक शेतकर्यांना होत असल्याने तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून दर 10 दिवसांचे ऊस पेमेंट आदा होत असल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळालेला असून आनंदाचे वातावरण आहे. यास्तव शेतकरी संघटनेचे नेते महाराष्ट्र किसान मंच कार्याध्यक्ष-शंकरअण्णा गोडसे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्ष श्रीमती संगिता मोडक, सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव, सातारा युवा जिल्हा अध्यक्ष-शिवाजी कोळेकर, पाटण तालुकाध्यक्ष-प्रशांत पाटील, सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष-श्रीमती पुनम गायकवाड, कराड तालुका अध्यक्ष-यासिन पटेल, हवेली तालुका अध्यक्ष-सौ.चैत्राली कोलते, सातारा महिला आघाडी-सौ.प्रेमिला कोलते पाटील, मायणी अर्बन बँक व्हाईस चेअरमन-नवनाथ फडतरे,काटेवाडीचे बजरंग कचरे, खंडाळा तालुका अध्यक्ष-रविंद्र ढमाळ, कराडचे प्रमोद माने, सातारा कोरेगाव-सोपानराव कदम इत्यादींनी दि. 23.1.2021 रोजी कारखाना स्थळावर येऊन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक- आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले चेअरमन- सर्जेराव दिनकरराव सावंत, व्हाईस चेअरमन- विश्वास रामचंद्र शेडगे, संचालक मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकारी संचालक- संजीव देसाई इत्यादींचे अभिनंदन करून शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करून आभार मानले.
यावेळी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सभासद ऊस उत्पादक शेतकर्यांकडून व आपणा सर्वांकडून सदोदित हार्दिक सहकार्य मिळत असून संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि कारखान्याचे पारदर्शक कारभारामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता ठेवणे मला शक्य होत आहे आणि म्हणूनच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातसुध्दा आपले अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज उल्लेखनिय व आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |