08:52pm | Nov 28, 2020 |
सातारा : येथील भूविकास बँक चौकामध्ये एकास लिफ्ट मागण्याचा बहाणा करून दोघांनी अंधारात नेवून चाकूचा धाक दाखवून 42 हजारांचा ऐवज लुटून नेला. या सराईत चोरटयांचा शाहूपुरी पोलिसांनी सलग 36 तास मागोवा घेत त्यांना व्याजवाडी येथून पहाटे जेरबंद करुन मुद्देमाल हस्तगत केला. दत्तात्रय उत्तम घाडगे रा. सुर्यवंशी कॉलनी, दौलतनगर, करंजे, सातारा आणि लाल्या ऊर्फ मयुर काशिनाथ राठोड रा.आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा अशी संशयितांची नावे असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, दि.26 रोजी सातारा शहरातील भूविकास बँक चौकामध्ये लिप्ट मागण्याचा बहाणा करुन फिर्यादीला दोनजणांनी नर्मदा स्कुलजवळ आंधारात नेले. तेथे फिर्यादीला चाकुचा धाक दाखवुन व मारहाण केली व त्याच्याकडून 42 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा गंभीर असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यास मार्गदर्शन करुन तपासाबाबत सुचना दिलेल्या होत्या. हा गुन्हा सराईत चोरटयाने साथिदारच्या मदतीने केला असल्याचे व व दोघे चोरटे पुणे येथे गेले असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करुन आरोपी शोधार्थ रवाना केले. पथकाने तांत्रिक विश्लेषणव्दारे आरोपींचा पुणे येथे शोध घेतला. परंतु, आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्यानमुळे मिळुन येत नव्हते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींबाबत कौशल्यपुर्ण माहिती प्राप्त केली असता आरोपी व्याजवाडी, ता. वाई असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर तात्काळ पुणे येथून व्याजवाडी येथे येवून सापळा लावून त्यास पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडे चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर कसून चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल हॅन्डसेट, मोटार सायकल, दोन पाकीटे, ए.टी.एम.कार्ड, रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार चाकु असा एकुण 37 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, पो. ना. लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, श्रीनिवास देशमुख, पोकॉ ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सुनिल भोसले यांनी केली आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |