05:26pm | Apr 13, 2021 |
सातारा : एनएच 965डी या राष्ट्रीय महामार्गावरील लोणंद ते आदर्की फाटा या भागातील रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी दर्जोन्नतीकरीता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री ना.नितिन गडकरी यांना या रस्त्यास मंजूरी देणेबाबत नुकतीच विनंती केली होती. त्यानुसार दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोणंद ते आदर्की फाटा अखेर रस्त्याच्या बळकटीकरणासाठी 12 कोटी 89 लाख 61 हजार 423 रुपयांच्या अंदाजपत्रकीय कामास कालच मंजूरी दिली आहे, अशी माहिती जलमंदिर पॅलेस येथुन दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जनसंपर्क कार्यालय, जलमंदिर पॅलेस येथुन जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा जिल्ह्यातील लोणंद हे ग्राणिम आणि शहरी लोकसंख्येचा मिलाफ असलेले शहर पूर्वीपासून व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते, लोंणंदवासियांना, नोकरी-व्यवसाय, व्यापार-उदिम, शिक्षण इत्यादी अनेक कामासाठी सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी यावे-जावे लागत असते. तसेच लोणंदच्या कांदा बाजारपेठ व अन्य कारणाकरीता, सातारवासीय देखील लोणंद येथे सातत्याने जात येत असतात. या रस्त्यावरील दैनंदिन वाढती रहदारी तसेच पुणे सातारा या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून या रस्त्यावरुन दक्षिणेकडे जाणारी जड-वाहतूक विचारात घेवून, या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रोधिकरणाच्या अखत्यारित आल्याने, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या रस्त्याच्या रंदीकरण, मजबुतीकरण, दर्जोन्नतीसाठी विशेष विनंती ना.नितिन गडकरी यांचेकडे वारंवार केली होती. त्यानुसार पहिल्या टप्यातील आदर्की फाटा ते सातारा या रस्त्याचे काम काही दिवसापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. तथापि आदर्की फाटा ते लोणंद अखेर रस्त्याच्या भागाचे मजबुतीकरण प्रलंबीत होते.
याकरीता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकतीच ना.नितिन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आदर्की ते फलटण या रस्त्याच्या दर्जोन्नती/बळकटीकरणासाठी तातडीने मंजूरी दयावी अशी मागणी केली होती. त्यानुसार ना.नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाला सूचना दिल्या होत्या आणि म्हणूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एनएच 956ऊ या रस्त्याच्या लोणंद ते आदर्की फाटा या एकूण 17.145 किलोमिटरचे दर्जोन्नतीचे कामास सुमारे 13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी प्रदान केली असून, सदरचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
लोणंद ते सातारा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सूचवला असून, भविष्यात सदरचा प्रस्ताव देखिल मंजूर होवून, गतीमान दळणवळण व्यवस्था अस्तित्वात येईल असेही प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांचे असलेले घनिष्ठ जिव्हाळयाचे संबंध लक्षात घेता या दोघांमुळे आदर्की फाटा ते लोणंद अखेरच्या सुमारे 13 कोटींच्या कामास मंजूरी मिळाल्याने, लोणंदकर आणि सातारा जिल्हावासियांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |