10:30pm | Nov 27, 2021 |
- प्रकाश राजेघाटगे
महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक स्तरात ठाकरे कुटुंबाचे नांव नेहमीच अग्रक्रमाने घेतले जाते कारण गेल्या तीन पिढ्यांचे महाराष्ट्रासाठी भरीव योगदान आहे.प्रबोधनकार ठाकरे यांनी सामजिक व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिरिरीने सहभाग घेतला. त्यांचे सुपुत्र बाळ ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख ते हिंदूह्यसम्राट जीवन प्रवास संपूर्ण देशाने पाहिला. आज बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. प्रबोधनकार व बाळासाहेब दोन वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली.शुन्यातून सुरुवात केल्यामुळे या दोघा पिता-पुत्रांना काही गमविण्याची भिती नव्हती.या उलट परिस्थिती श्री.उध्दव ठाकरे यांच्या समोर आहे. वडिलांचा समृध्द वारस जपत पक्षविस्ताराचे अवघड कामही त्यांना पार पाडायचे आहे.आजपर्यत सतत टीकेचे धनी झालेले उध्दव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाचा पट लेखक व जेष्ठ पत्रकार राधेश्याम जाधव यांनी "ट्रेल आँफ द टायगर" रुपाने मांडला आहे.या पुस्तकाचे मराठी अनुवाद संजय विष्णू तांबट केले असून ते "वाघाच्या पाऊलखुणा" या नावाने नुकतेच प्रकाशित झाले आहे.या निमित्ताने आपणांस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजकीय संघर्ष जवळून पाहण्याची संधी निर्माण झाली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशावर त्यांचे लाखो अनुयायी म्हणजे शिवसैनिक परिणामांची चिंता न बाळगता रस्तावर उतरून आंदोलन करत असत. अशाच कडवट शिवसैनिक महेश पाटील यांच्या परिचयाने पुस्तकाची सुरूवात होते.महेश पाटील हे विरवडे,ता.कराड,जि.सातारा येथील भूमिहीन शेतकरी,पेशाने शिवणकाम करणारे सामान्य नागरिक असून १९९७ साली पुण्यात झालेल्या बाळासाहेबांच्या सभेनंतर शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकून कट्टर शिवसैनिक झाले. नंतर बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेसाठी ते पदरमोड करून हजर राहू लागले. त्याच साली रेठरे बु.ता-कराड,जि-सातारा येथे उध्दव ठाकरे यांचे विचार ऐकून त्यांना शिवसेनेच्या या भावी नेतृत्वाबद्दल विश्वासार्हता वाटू लागली.त्यांच्याकडे गेली २५ वर्षे असलेल्या दै.सामना वृत्तपत्राचे संकलन ही विशेष बाब म्हणून नमूद करावे लागेल. दोन वर्षांपूर्वी उध्दव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना महेश पाटलांच्या एका डोळ्यात हसू तर दुसर्या अश्रू हेच सांगत होते की, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व निर्विवाद मान्य केले आहे.
२७ जुलै १९६० साली जन्मलेल्या उध्दव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख लाडाने डिंगा म्हणून हाक मारत असत.मुंबईतील बालमोहन विद्यामंदिर शाळेचा या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण जे जे कला महाविद्यालयातून पूर्ण झाले.उध्दव ठाकरे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी कधीही बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग केला नाही.मुबंई लोकल प्रवास करत ते नेहमी काँलेज ला जात असत.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मित्र अजित जयकर सोबत चौरंग अँडव्हर्टायजिंग नावाची एजन्सी सुरू केली.याच दरम्यान डोंबिवलीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील रश्मी पाटणकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.उध्दव ठाकरे यांच्या सुरुवातीचे असे अनेक किस्से सांगून लेखक राधेश्याम जाधव यांनी पुस्तकाची सुरूवात केली आहे.
सुरूवातीला सामना चे कामकाज पाहता-पाहता उध्दव ठाकरे यांचा राजकीय प्रवेश सुरू झाला.१९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ८० सभा घेऊन आपले राजकीय बस्तान बसविले.पण या काळातही आपले छंद जोपासण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला.महाराष्ट्र देशा व आषाढी वारीचे हवाई छायाचित्रणांची विशेष नोंद घ्यावी लागते.युतीची सत्ता असताना त्यांचा पक्षातील वावर व राज ठाकरे यांच्या संबंधातील दुरावा लेखकाने अत्यंत सफाईदारपणे मांडला आहे.महाबळेश्वरच्या अधिवेशनात कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड ते नारायण राणे व राज ठाकरे यांच्या पक्षांतर्गत मतभेद यावरही सखोल विवेचन पुस्तकात आढळून येते.२००७ च्या महानगरपालिका निवडणूकीत उध्दव ठाकरे यांनी विशेष प्रयत्न करून मुंबई-ठाणे काबीज केले पण ते यशाचे मानकरी होऊ शकले नाही,कारण बाळासाहेबांचा करिश्मा काम करून गेला असा कित्येकांचा समज होता.पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने साथ सोडून सुध्दा ६३ जागा निवडून आणून शिवसेनाप्रमुखांचा निर्णय सार्थ ठरविला. सतत होणार्या टीकेवर संयम राखून योग्य वेळी उत्तर देण्याचे कसब उध्दव ठाकरे खूप प्रयत्नातून साध्य केले आहे.वडीलासारखी वक्तृत्वशैली नसतानाही शिवसैनिक व विरोधकांना विचार करायला लावणारे भाषण ही उध्दव ठाकरे यांची शैली कोरोना काळात जनतेला नेहमीच भावली आहे.
२०१४-१९ काळात सत्तेत असतानाही आपल्या मित्र पक्षांवर टीका करताना त्यांनी जीभ कधीच अडखळली नाही.२०१४ सालानंतर नरेंद्र मोदी हिंदूचे कैवारी आहेत असे भाजपा दाखवत असताना भाजपाच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न संपूर्ण देशात उध्दव ठाकरे यांनीच केला.दोनदा अयोध्यावारी करून राममंदिर हा कुठल्या पक्षाचा नव्हे तर समस्त हिंदूच्या आस्थेचा विषय आहे हे ठामपणे सांगणारे उध्दव ठाकरे हेच होते.नोटबंदीवरून केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदारपणे टीका करणारे उध्दव ठाकरे भाजपाच्या विरोधी पक्षांची भूमिका सत्तेवर असूनही बजावतात अशी टीका ही त्यांनी सहन केली पण जनतेच्या प्रश्नांवर आपली ठाकरी तोफ नेहमीच चर्चेत ठेवली.२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता असतानाही त्यांनी तो निर्णय घेतला,पण विधानसभेची आराखडा बांधून च निर्णय घेतला.जागा वाटपात माघार घेताना उध्दव ठाकरे मवाल झाले ही टीकाही सहन केली परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आता तडजोड स्वीकारणार नाही हे स्पष्टपणे सांगितले.सत्तासंघर्षाच्या काळात संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत होणार्या वक्तव्याचा त्यांनी कधीही स्पष्टीकरण दिले नाही.कधीही मातोश्री बाहेर न पडणारे उध्दव ठाकरे या काळात मातोश्री बाहेर पडून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू लागले व त्यात यशस्वीही झाले. या सर्व घटनाक्रमाचे रोमहर्षक वर्णन अतिशय सुरेख शब्दात लेखकाने मांडले आहे.मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जनतेसमोर नतमस्तक होऊन काम करण्याची ग्वाही देत समाजाबद्दलची कर्तव्यदक्ष भूमिका पार पाडली.आणि हे सर्व होत असताना महेश पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना उध्दव ठाकरे हिंदुत्ववादी विचारसरणी वरून आगामी काळात मार्गक्रमण करतील या आशेवर पुस्तकाचा शेवट होतो.
शिवसेना ही संघटना म्हणून स्थापन होऊन पुढे तिचे रूपांतर पक्षात झाले.शिवसेनाप्रमुखानंतर हा पक्ष संपून जाईल अशी काही लोकांची इच्छा असताना आणि मोदींच्या झंझावातात काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला असतानासुद्धा उध्दव ठाकरे शिवसेना वारू अतिशय उत्तम रीत्या चालवत आहेत. शिवसेनेचा राज्याबाहेर खासदार निवडून आणण्याचा भीमपराक्रम उध्दव ठाकरे केला आहे.म्हणून तर वाघाच्या पाऊलखुणा हे पुस्तकाचे शीर्षक उध्दव ठाकरे हे सार्थ ठरवत आहेत. सतत टीकेचे धनी होऊनही आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आणि संयम राखून यश संपादन करू शकतो हीच शिकवण या पुस्तकातून वाचकांना मिळेल असा आशावाद व्यक्त होतो
लेखक राधेश्याम जाधव पुरस्कारप्राप्त पत्रकार असून त्यांच्याकडे पत्रकारिकतेचा वीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पत्रकारिता आणि संज्ञापनशास्त्र विषयात पीएच. डी.केली असून ब्रिटीश शेंवनिंग गुरुकुल पाठ्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. पत्रकारितेतील मानचा समजला जाणारा रामनाथ गोयंका पुरस्कार दोनदा मिळाला आहे. डाँ राधेश्याम जाधव यांना आतापर्यंत पत्रकारितेतील विविध वीस पुरस्कार मिळाले आहेत. हिंदू ,टाइम्स आँफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस अशा विविध वृत्तपात्रासाठी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |