02:13pm | Sep 16, 2020 |
कोटा : चंबळ नदीत बोट उलटून मोठा अपघात घडला आहे. राजस्थानच्या कोटा जिल्हयात ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडल्याचे समोर येत आहे. या बोटीतून लहान मुल आणि महिलांसह जवळपास 50 प्रवासी प्रवास करत होते.
या दुर्दैवी घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुंदी जिल्ह्याच्या सीमेवर गोठडा कला गावानजिक चंबळ नदीत ही घटना घडलीय. या बोटीत काही प्रवाशांशिवाय सामान आणि वाहनंही भरली गेली होती. बोटीतून प्रवासी बुंदी भागातील कमलेश्वर धामकडे जात होते. परंतु, नदीच्या मध्यभागात असतानाच बोट पलटली आणि हा अपघात घडला.
यासंबंधी सूचना मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तातडीनं हालचाली करत प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. घटनास्थळावर एसडीआरएफची रेस्क्यू टीम उपस्थित आहे. सोबतच अॅम्ब्युलन्सलाही पाचारण करण्यात आलंय.
या दुर्घटनेतील जवळपास 20 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर जवळपास सात मृतदेह पाण्यातून बाहेर काढले गेल्याची माहिती मिळतेय. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध अद्याप सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बोटीत अधिकांश वयस्कर व्यक्ती, महिला आणि मुलांचा समावेश होता. यातल्या बर्याच जणांना पोहताही येत नव्हतं.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |