04:35pm | Aug 28, 2020 |
नवी दिल्ली: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही वृत्त होतं. अखेर आज शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी जबाबदारी पार पाडणं शक्य नसल्याचं सांगत अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना शिंजो आबे भावूक झाले. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. त्याचबरोबर मी ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला प्रचंड वेदना होत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मागील काही दिवसांपासून आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट दिल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. मागील बर्याच काळापासून आबे यांना आतड्याच्या सुजेने होणार्या अल्सरचा त्रास आहे. आबे आणि मोदींच्या काळामध्ये भारत आणि जपानमधील संबंध अधिक बळकट झाल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच आता आबेंच्या जागी कोण येणार याकडे भारताचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, जपानचे अर्थमंत्री तारो असो, माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा, परराष्ट्र मंत्रीपदी काम केलेले फुमिओ किशिदा, संरक्षणमंत्री तारो कोनो यांच्या नावांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |