07:57pm | Jun 26, 2022 |
वाई : शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावून महाविकास आघाडी सरकारला झटका देऊन गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हाॅटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथे वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून नियमित पोलीस बंदोबस्त असल्याचे उपअधीक्षक डॉ शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.
कोणताही बंदोबस्त हलवला अथवा काढण्यात आलेला नाही. ते महाराष्ट्राबाहेर गेले त्या दिवसापासून वाई उपविभागातून नियमित पाच पोलीस कर्मचारी व बीट च्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असल्याचे वाई उपविभागाच्या उपअधीक्षक डॉ शीतल जानवे- खराडे यांनी सांगितले.
गावातील घराचा बंदोबस्त हटवण्यात आल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकारण सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली होती. सातारा जिल्ह्यातील दरे तांब (ता. महाबळेश्वर) हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे नेहमी येणे-जाणे असते.
शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर घरावर हल्ला चढवला जात आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ लावलेले फ्लेक्स फाडून टाकले आहेत. काहींना काळंही फासलं जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने बंडखोर आमदारांनी चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावी असणाऱ्या घरासमोरील बंदोबस्त काढण्यात आलेला नाही. चुकीची माहिती बाहेर पसरवली जात असल्याचे वाईच्या पोलीस उपाधीक्षक डॉ शितल जानवे खराडे यांनी सांगितले.
15 आमदारांच्या निवासस्थानी सीआरपीएफचे जवान
धास्तावलेल्या आमदारांनी केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली होती. दरम्यान, मिळालेल्या आतापर्यंत 15 आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे सीआरपीएफचे जवान यांच्या निवासस्थानी तैनात असतील. दरम्यान, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या निवासस्थानी सीआरपीएफचे जवान तैनात होतील. अनेक बंडखोर आमदारांनी आपल्या कुटुंबीयांना भीती वाटत असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे केंद्राकडून सुरक्षा मिळाल्यानंतर या सर्व प्रकरणात भाजपचा सहभाग स्पष्ट होत असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, काल एकनाथ शिंदे यांनी काल सूडभावनेतून आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आरोप फेटाळून लावत कुठल्याही आमदाराची सुरक्षा काढून घेण्यात आलं नसल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे हे चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावाही गृहखात्याकडून करण्यात आला होता.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |