10:15pm | Oct 21, 2020 |
सातारा : बुधवारी जिल्ह्यात 9 बाधितांचा मृत्यू, तर 274 बाधित निष्पन्न झाले. तसेच 288 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 391 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील 9 बाधितांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1 हजार 458 वर पोहोचली आहे. तसेच 274 बाधित निष्पन्न झाल्याने बाधितांचा आकडा 44 हजार 410 वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 288 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 37 हजार 653 वर पोहोचली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील 4 हजार 985 बाधितांवर उपचार सुरु असून 391 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
9 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत कोडोशी अंबवडे ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पोफळकरवाडी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोळवडी ता. वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, दुर्गळवाडी ता. कोरेगाव येथील 77 वर्षीय पुरुष. विविध खासगी हॉस्पिटलमध्ये वाई येथील 75 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 83 वर्षीय पुरुष, मोरावळे ता. जावली येथील 83 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले तांबवे ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा 9 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
391 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड येथील 12, फलटण येथील 15, कोरेगाव येथील 40, वाई येथील 29, खंडाळा येथील 26, रायगाव येथील 37, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 18, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 18, दहिवडी येथील 15, खावली येथील 8, तळमावले येथील 22, म्हसवड येथील 20, पिंपोडा येथील 10, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 56 असे एकूण 391 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |