09:47pm | May 28, 2020 |
सातारा : प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सदर बझार येथे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने लावण्यात आलेले रस्त्यावरील अडथळे आज दुपारी नगरपालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. या अडथळ्यांमुळे द्रविडी प्राणायाम कराव्या लागणाऱ्या वाहनचालकांनी मात्र निश्वास सोडला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर खबरदारीचे सर्व उपाय प्रशासनाने हाती घेतले होते. दरम्यानच्या काळात सदर बझार येथील रहिवासी असणाऱ्या आणि सातारा जिल्हा रुग्णालयात एक्स-रे टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच शहरातील पूर्व भागात एकच खळबळ उडाली होती. खबरदारीचे उपाय म्हणून सातारा जिल्हा प्रशासनाने नगरपालिकेच्या माध्यमातून सदर बझार या भागाला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. १ महिन्यापूर्वी सातारा जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील मार्ग, के.बी.पी. कॉलेज समोरचा मार्ग, सदर बझार येथील एमएसीबी कार्यालयासमोर रस्त्यावर बांबू बांधून तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून याकडे पाहण्यात येत असले तरी परिसरातील नागरिकांना मात्र हे रस्ते दळणवळणासाठी बंद झाल्यामुळे पोवईनाका, राजवाडा, वाढे फाटा, एमआयडीसी येथे वाहनांनी जाण्यासाठी द्रविडी प्राणायाम करावा लागत असे. कनिष्क मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांना पोवई नाक्यावर जायचे असेल तर जिल्हा परिषद चौकात जाऊन तेथून मुख्य रस्त्याने त्यांना जावे लागत असे, त्यामुळे वेळ आणि इंधन अधिक खर्च होत असल्यामुळे सदर बझार येथील रस्त्यावरील अडथळे केव्हा करतात याकडे वाहनचालकांचे लक्ष लागून राहिले होते. ३१ मे रोजी लॉक डाऊन संपत असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्याचे आज दिसून आले. आज दुपारी सदर बझार परिसरात असणारे रस्त्यावर लावणारे अडथळे पूर्णपणे काढण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |