04:13pm | Apr 06, 2021 |
सातारा : कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत द्यावी आणि सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोना लस द्यावी, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या राज्यव्यापी ‘ई-मेल पाठवा’ आंदोलनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, माहिती राज्यमंत्री, महासंचालक यांना 500 मेल पाठवण्याचे नियोजन होते. मात्र दिवसाअखेर 789 मेल पाठवले गेले. दरम्यान, परिषदेच्या आवाहनास राज्यातील पत्रकार, सर्व तालुका आणि जिल्हा संघानी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
गडचिरोली, चंद्रपूर, ते सावंतवाडी अशा राज्याच्या सर्वच भागातून सोमवारी सकाळी 6 पासूनच मेल पाठवायला सुरूवात झाली होती. जवळपास एका मिनिटाला एक मेल पडत होता. पत्रकारांच्या आपल्या प्रश्नांसंबंधी किती तीव्र भावना आहेत हेच यातून दिसत होते. अनेकांनी संताप व्यक्त करणारे ट्टिट देखील मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांना केले. महाराष्ट्रात सर्वत्र पत्रकारांच्या या अनोख्या आंदोलनाचीच चर्चा सुरू होती. ई-मेल आंदोलन राज्यातच नव्हे तर देशातच पहिल्यांदा झाले आणि त्याचा योग्य तो परिणाम देखील दिसून आला. आ. जितेंंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून विषयाचे गांभीर्य त्यांच्या कानी घातले. मुख्यमंत्र्यांनी लवकरच सर्व वयोगटातील पत्रकारांना लस देण्यात येईल, असे सांगितल्याचे ट्टिट जितेंद्र आव्हाड यांनी केले. राज्यातील बहुतेक पक्षीय, विविध संघटनांनी देखील पत्रकारांना लस मिळाली पाहिजे यासाठी समर्थन केले.
महाराष्ट्रात 20 फेब्रुवारी 2021 पासून 26 पत्रकारांचे निधन झाले आहे. यातील बहुतेक पत्रकार 35 ते 50 या वयोगटातील होते. तरूण पत्रकार सातत्याने कामासाठी बाहेर फिरत असल्याने त्यांचे बाधित होण्याचे प्रमाणही जास्त आहे. मात्र या वयोगटाकडेच सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर समजून सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.
राज्यात या वयोगटातील केवळ 6 हजार पत्रकार असल्याने उत्तराखंड आणि गुजरातच्या धर्तीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे परिषदेचे म्हणणे आहे. शिवाय केंद्राच्या धर्तीवर पन्नास लाख नव्हे तर किमान पाच लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य तरी जे पत्रकार कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबियाना द्यावे अशीही मागणी आहे. सरकारने आठ दिवसांत या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दिपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुजीत आंबेकर, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, दिपक शिंदे, दिपक दिक्षीत, राहूल तपासे, तुषार तपासे, ओंकार कदम, सनी शिंदे, प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी ई मेल पाठवा आंदोलनाला प्रतिसाद दिला. इलेक्ट्रॉनिक मिडीया देखील यामध्ये सहभागी झाली होती. याशिवाय वैयक्तिक पातळीवर शेकडो पत्रकारांनी देखील आंदोलनात सहभागी होवून ई मेल पाठवा आंदोलन केले. त्याबद्दल सातारा जिल्हा पत्रकार संघाने सर्व पत्रकारांना धन्यवाद दिले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |