05:59pm | Jan 22, 2022 |
सातारा : जिल्हा नियोजन समितीमधुन विविध तालुक्यातील विकास कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी एकूण रुपये 24 कोटी रुपयांची सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
जलमंदिर पॅलेस येथुन प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील विकासकामांचा आराखडा तयार करण्यात येत असतो. या आराखड्यास राज्यशासनाकडून मंजूरी मिळाल्यावर आराखड्यातील एकूण रकमेची कामे मार्गी लागतात. जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही स्वतः सदस्य आहोत. नियोजन समितीचा सदस्य आणि संसदेचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नियोजन समितीमधुन होणारी विकास कामे प्रस्तावित केली होती. या कामांपैकी एकूण सुमारे 24 कोटीरुपयांची खालील प्रमाणे तालुकानिहास विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या विकास कामांत विविध गावपातळीवरील रस्ते, गटर्स, समाजमंदिरे, स्मशानभुमी संदर्भातील रस्ते, प्रतिक्षा शेड आदी विकास कामांचा समावेश आहे.
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रीया आहे. सर्वसामान्यांच्या विकासाकरिता, राज्यासह प्रामुख्याने केंद्राच्या निधीचा सुयोग्य उपयोग करुन घेवून, विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे. यामध्ये सामान्य ग्रामस्थ हाच केंद्रबिंदू मानुन, राजकारण विरहित समाजोपयोगी विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमचे अखंड प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे 24 कोटींपेक्षा जास्त विकास कामे प्रस्तावित करण्यात आली होती. प्रस्तावित कामांपैकी, जवळजवळ सर्व विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. याकामी सन्माननीय पालक मंत्री, नियोजन समितीचे सर्व सदस्य आणि संबंधीत अधिकारी यांचे सहकार्य लाभले, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
सदरबझार येथून २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास |
सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस |
सातारा जिल्ह्यातील 440 'उमेद' समूहांना 7 कोटी कर्ज वाटप |
काळाची पाऊले ओळखून उद्योग विश्वाकडे चला : हेमलता भोसले |
नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड |
साताऱ्यात सराफी पेढी मधून महिलेचे दागिने लांबविले |
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु-सासर्यांवर गुन्हा |
कांगा कॉलनी मध्ये वृद्धाचा अचानक मृत्यू |
सातारा शहराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले |
ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा |
राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी |
पुण्यात आढळलेली शिवकालीन नाणी साताऱ्यातील संग्रहालयात |
स्वामी समर्थ गुरुपीठ सेवेकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार |
सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण |
भविष्यकाळात भारत विश्वगुरू होऊन जगावर सत्ता गाजवेल |

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
जगभरात मंकीपॉक्सचे थैमान : भारतातही सरकार 'अलर्ट मोड'वर |
देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
विजेचा शॉक लागून 23 वर्षीय युवकासह म्हैशीचा मृत्यू |
विनयभंगासह दुखापत केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल |