05:57pm | Nov 19, 2021 |
फलटण : सुरवडी, ता. फलटण गावातील कोकरे वस्ती व जाधव वस्ती येथीन गेलेल्या लोणंद-फलटण रेल्वे मार्गाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. परंतू रेल्वे ब्रीज नंबर 18 येथील वाहतुकीसाठी रस्त्याचे काम पुर्ण ना झाल्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे. प्रलंबित काम आठ दिवसात पुर्ण न झाल्यास, सुरवडी येथील शेकडो नागरिकांसह फलटण तालुका शिवसेना, सुरवडी येथे लोकशाही मार्गाने तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला.
सुरवडी, ता. फलटण गावातील कोकरे वस्ती व जाधव वस्ती येथील जवळुन गेलेल्या लोणंद-फलटण रेल्वे मार्गाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. परंतु कोकरे वस्ती व जाधव वस्ती येथील रेल्वेच्या ब्रीज नंबर 18 समोर मोठ्या पाईप टाकुन उत्तराने येणाऱ्या पाण्याचा प्रवाह त्यातुन वाहुन जाईल व वरुन वाहतुकीसाठी रस्ता अबाधित राहिल, असे योग्य नियोजन रेल्वे खाते व ठेकेदाराने केले होते. परंतु रेल्वे खाते व ठेकेदार यांनी योग्य समन्वय न घालता त्यांच्या अकार्यक्षम व निष्काळजीपणामुळे नियोजन केल्याप्रमाणे काम न होता. त्याठिकाणी अंदाजे 50 फुट लांब, 15 फुट रुंद व 10 फुट खोल असा खड्डा झाल्याने तीन महिन्यांपासुन तेथील ग्रामस्थांची वाहतूकीमुळे सर्वच प्रकारे खुप मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यात त्या खड्ड्यात पाणी साठून त्याचा रस्त्यातच तलाव होत आहे. त्यावेळी लोकांना ब्रीजवरुन दोन चाकी गाड्यांची कसरत करावी लागत आहे. यामुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे फलटण तालुका शिवसेना रेल्वे प्रशासन अधिकारी व ठेकेदार यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय योग्य विचार विनीमय करुन करणार असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्पष्ट सांगितले आहे.
रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने ऊस तोडीला आलेल्या कामगारांच्या टोळ्या रस्त्याअभावी माघारी फिरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त करुन जवळपास 200 एकर ऊस त्या भागात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास याची संपुर्ण जबाबदारी फलटण तालुका प्रशासन व रेल्वे खात्याची असेल, असेही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी सांगितले.
तसेच प्रलंबित काम आठ दिवसात पुर्ण न झाल्यास, सुरवडी येथील शेकडो नागरिकांसह फलटण तालुका शिवसेना लोणंद-फलटण चौपदरीकरणावर सुरवडी येथे लोकशाही मार्गाने तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. आंदोलनवेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची संपुर्ण जबाबदारी फलटण तालुका प्रशासन व रेल्वे खात्याची असेल, असे लेखी निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे, विभाग प्रमुख किसन यादव, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, सुरवडी शाखाप्रमुख हेमंत वाघ व दत्तात्रय मदने, तानाजी पवार, नंदकुमार कोकरे, धोंडीराम कोकरे, दत्तात्रय कोकरे, किसन कोकरे, बाळासाहेब जाधव, नानासाहेब जाधव, मनोज जाधव, गजानन पवार, महादेव कोकरे, मयूर निंबाळकर, मयूर भोसले, प्रकाश कोकरे, नीलेश कोकरे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनावर एकुण 70 ग्रामस्थांनी सह्या केलेल्या आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |