10:33pm | Mar 06, 2021 |
सातारा : गावठाणाच्या हद्दीत घर का बांधले आहे, असे म्हणाल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी रामचंद्र लक्ष्मण कदम रा. कडोली, ता. पाटण याला न्यायालयाने ३ महिने साधी कैद व ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादीला दीड लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, ती न दिल्यास ४ वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि.१ जानेवारी २०१२ रोजी ११.२० वाजण्याच्या सुमारास कडोली, ता. पाटण गावी फिर्यादी यांनी रामचंद्र लक्ष्मण कदम रा. कडोली याने गावठाणाच्या हद्दीत घर का बांधले आहे असे फिर्यादी म्हणाल्याच्या कारणावरून फिर्यादी व त्याच्या साक्षीदाराला कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्याची सुनावणी आज कराड, ता. कराड येथील अतिरिक्त न्यायाधीश यांच्यासमोर झाली. न्यायालयाने रामचंद्र लक्ष्मण कदम याला ३ महिने साधी कैद व ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली तसेच कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादीला दीड लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, ती न दिल्यास ४ वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली.
या खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून आर. सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस नाईक पवार यांनी मदत केली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |