फलटण : काळानुरुप स्वतःमध्ये चांगले बदल करणं आपल्या प्रगतीसाठी लाभदायकच ठरतं. त्यात तुम्ही जर खेळाडू असाल, तर तुम्हाला जास्त सजग राहावं लागतं. तुमच्या खेळाचं स्वरुप, व्यायाम आणि तुमची पचनशक्ती त्यानुसार तुमचा आहार ठरतो. ही गोष्ट आहे अशाच एका खेळाडूची.. स्वतःमध्ये बदल घडवत, स्वतःचा खेळ सुधारत महाराष्ट्राच्या सातारा जिल्हातल्या फलटण तालुक्यातील एक टेनिस खेळाडू, विश्वजीत सांगळे झालाय भारतातला पहिला “विगन” टेनिसपटू !
टेनिस खेळण्यासाठी हातात, मनगटात भरपूर ताकद लागते. त्यासाठी अनेक जण मांसाहाराचा पर्याय निवडतात. पण मांसाहार पूर्ण वर्ज्य करुन दूध, पनीर असे प्राण्यांपासून मिळणारे जिन्नस खाणंही त्याने बंद केलं आणि विश्वजीत सांगळेने भारताचा पहिला “विगन” टेनिसपटू होण्याचा मान मिळवत इतर खेळाडूंसाठी एक प्रेरणा दिली आहे.
भारतात निसर्गोपचाराला पूर्वापार महत्त्व आहे. आता ते पाश्चात्य देशानेही मान्य केले आहे. २०१७ पासून विश्वजीतनेही “विगन” होण्याकडे पहिलं पाऊल टाकलं. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात, जिथे दूध-तुपाला स्वयंपाकघरात खूप महत्त्व आहे, तिथे असा निर्णय घेणं सोपं नव्हतं. पण जिद्द आणि घरच्यांची साथ त्याला लाभली आणि आता तो “गुडमिल्क”, “ओरिजिन न्यूट्रिशन” यासारख्या अनेत “विगन” ब्रँड्सचा ब्रँड अँबॅसिडर झालाय.
विश्वजीत हा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील असून तो सध्या मुलुंड (मुंबई) येथे स्थायिक झाला आहे देश-विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व केले असून अनेक स्पर्धांमध्ये तो यशस्वी झाला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर एफ एफ टी अंतर्गत बारव्हीले, पॅरिस व एस टी एफ लिग सिंगापूर तसेच आय टी एफ किर्गीस्तान येथे खेळाचे उत्तम प्रदर्शन करून यश संपादन केले आहे.राष्ट्रीय पातळीवर हिसार-हरियाना,कोची,त्रिवेंद्रम, कलकत्ता,औरंगाबाद, बडोदा, बंगलोर, पुणे, मुंबई येथील स्पर्धामध्येही यश मिळविले आहे
विश्वजीत ला फिटनेस आयकॉन म्हणतात. आता विश्वजीत स्वतःसारख्याच इतर “विगन” खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावलाय. त्यांना लागणारं सप्लिमेंट, न्यूट्रिशन हे इतर खेळाडूंपेक्षा वेगळं असतं. क्वचित महागही असतं. त्यांना स्पॉन्सरशिप मिळवून देणं, त्यांचं ब्रँड मॅनेजमेंट करणं यासाठी विश्वजीतने “एस्परर” नावाची स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी सुरु केली आहे.
विश्वजीत म्हणतो, “जगात माणुसकी कमी होत चालली आहे, पृथ्वीचा ऱ्हास आपण स्वतःच करत चाललोय. पृथ्वीचा समतोल बिघडत चाललाय. या सगळ्याला “विगनिजम” हे एकच उत्तर नसलं, तरी अनेक उत्तरांपैकी एक तर नक्कीच आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |