शिक्षणापासून समाजाने दूर लोटलेल्या अंध:काराच्या छायेखाली खितपत पडलेल्या बहुजन समाजातील लोकांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. शिवराम लक्ष्मण माने (गुरुजी). त्यांचा आज प्रथम पुण्य स्मृतिदिन. त्यानिमित्त...
एक दिव्य ज्योत
सुचले तर खूप काही आहे पण,
ईश्वराबद्दल लिहायला तेवढी माझी कुवत नाही.
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही.
ज्ञानदानाची ज्योत अविरत तेवत ठेवली,
खिसा रिकामा असला तरी,
शाळेतील मुले तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली.
वर्ष संपता डोळे आपले पाणावले जरी,
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही...
बाबांचा जन्म 15 मार्च 1933 मध्ये गारवडे, ता. पाटण येथे झाला. बाबांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील गरजू, गरीब आणि वंचित लोकांसाठी समर्पित केले. ते स्वतः पेशाने शिक्षक असले तरी त्यांच्या स्वत:मधील एक समाजसेवक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. या कारणास्तव त्यांनी शिक्षकी पेशाचा राजीनामा देवून 3 ऑक्टोबर 1988 मध्ये श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व आपल्या महान कार्याने त्यांनी समाजात एक नवीन विचार व विचारसरणी जागृत केली. शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातल्या लोकांपर्यंत, खेडोपाड्यातील अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या उदात्त हेतुने बाबांनी एकामागून एक शिक्षण संकुले उभारण्यास प्रारंभ केला.
दिन दलित समाजातील समाज बांधवांना प्रौढ शिक्षणाचे धडे दिले. भटक्या विमुक्त, दलित समाज बांधवांना न्याय हक्कांबाबत जागृत केले. शिक्षणाचे महत्त्व तळागाळातील लोकांना पटवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील करण्यासाठी बाबांनी जिल्हाभर फिरून जनजागृती केली. भटक्या विमुक्त समाजातील बहुसंख्य फिरस्त्या लोकांना शासकीय योजनेतून घरकुले व भूखंड मिळवून दिले. अनेक गृहनिर्माण संस्थांची स्थापना केली. बाबांनी कांग्रेस (आय) या राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा विमुक्त भटक्या जाती सेलचे अध्यक्षपद भूपविले. जिल्हाध्यक्ष म्हणून भरीव कार्य केल्यानंतर पक्षाने प्रदेश कॉंग्रेस कमिटीवर त्यांची निवड केली. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर सुध्दा विस्तारले. कैकाडी समाजातील विद्यार्थ्याना पुणे येथे शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहाची उभारणी केली. 1967 च्या भूकंपावेळी बाबांनी ख्रिस्तवासी डॉ. अक्षय मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक म्हणून भरीव कार्य केले.
सातारा शहरातील औद्योगिक वसाहतीमधील गोरगरीब कामगारांच्या पाल्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी श्री.छ. प्रतापसिंह राजेभोसले शिक्षण प्रसारक मंळाची स्थापना करून माध्यमिक शाळा सुरू केली. त्यानंतर स्वतःच्या पत्नीच्या नावाने कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र तसेच लोकमान्य विद्यामंदिर ही शिक्षण संकुले उभारली. बाबा शैक्षणिक व सामाजिक कार्यात अव्याहतपणे झटले. न डगमगता, न थकता कठीण प्रसंगांना सामोरे जात त्यांनी शिक्षणाची ज्ञानज्योत तेवत ठेवली. 2008 मध्ये कुसवडे व चिखली या दुर्गम डोंगरी भागामध्ये मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने माध्यमिक शाळा सुरू केल्या. खेडोपाड्यातील मुलांच्या शिक्षणास गती मिळाली. श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेचा शाखा विस्तार झाला.
बाबांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये लोकांच्या कल्याणासाठी अविश्वसनीय, अद्वितीय असे शैक्षणिक, सामाजिक कार्य केले. जेणेकरून समाजात मानवतावादी वातावरण निर्माण झाले. त्यांच्या कायांची दखल घेऊन 2006-07 चा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ व 2013-14 चा राज्यस्तरीय ‘कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून शासनाने त्यांचा तिहेरी सन्मान केला आणि त्यांना ‘दलितमित्र-समाजभूषण’ ही पदवी मिळाली.
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेने राबविलेल्या समाजभिमुख अनोख्या उपक्रमांमुळे प्रेरीत होवून इतर अनेक संस्था श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेबरोबर काम करण्यास सरसावल्या. साने गुरुजी शिक्षण संस्था कुसवडे, श्री रामेश्वर शिक्षण संस्था जायगाव, नेहरू युवा मंडळ गारवडी या विविध संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी अखेरपर्यंत भूषविले.
बाबांच्या नेतृत्वाखाली सर्व शाखा यशाच्या वाटचालीकडे जात होत्या. श्री जानाई मळाई शिक्षण संस्था आता श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन (जेमसेफ), सातारा (छॠज) म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरजू आणि गरीब लोकांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे यासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्यात कुटुंबीयांचे संपूर्ण सहकार्य त्यांना लाभले. यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना गुरुवार दि. 25 नोव्हेंबर 2011 रोजी अल्पशा आजाराने बाबांची प्राणज्योत मालवली. सर्वसामान्यांचा आधारवड गेला. बाबा अनेकांच्या जीवनात एक प्रेरणेची ज्योत घेवून आले. ज्यामुळे त्यांचे आयुष्य प्रफुल्लित झाले.
‘शून्यामधूनी विश्व निर्मुनी
किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रिती देवूनी
सत्य, सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी... !’
अशा या थोर महात्म्यास विन्रम अभिवादन!
- मनीषा कदम
(सहशिक्षिका)
श्रीराम माध्यमिक विद्यालय, चिखली, सातारा.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |