10:19pm | Oct 21, 2020 |
सातारा : सातारा शहर परिसरातून झालेल्या चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून दोघांना ताब्यात घेत 45 हजार रुपये किंमतीचे चंदन जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा शहरासह जिल्ह्यातील चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील या गुन्ह्याचा तपास करीत असताना दोन चोरी केलेल्या चंदनाची लाकडे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने सातारारोड, ता. कोरेगाव येथे बसस्थानक चौकामध्ये सापळा लावला असता मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा एक इसम व त्याचा साथीदार चौकात दिसून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. यांच्याकडे 45 हजार रुपये किमतीचे 15 किलो चंदनाच्या झाडाचे तुकडे मिळून आले असता त्यांच्याकडे त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी ती चंदनाची लाकडे मागील पाच महिन्याच्या कालावधीमध्ये सैनिक स्कूल, सदर बझार तसेच जिल्हाधिकारी बंगला, औद्योगिक वसाहत व कोडोली परिसरातून चोरी केली असल्याचे सांगितले. या दोघांना ताब्यात घेतल्यामुळे पाच चंदन चोरीचे उघडकीस आणण्यास मदत झाली आहे.
या कारवाईत सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिग साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, मंगेश महाडिक यांनी सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |