मेढा : जावली तालुक्यातील सनपाने गावचे सुपुत्र ओमकार मधुकर पवार यांनी संपूर्ण देशात यु.पी.एस.सी परिक्षेत ४५५ वी रॅंक मिळविली असून जावळी तालुक्यातील पहिले आय.पी.एस. अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांचा सत्कार जवळवाडीकरांच्या वतीने घेण्यात आला.
यावेळी सरपंच वर्षा विलास जवळ यांनी अभिमानाने सांगितले आपली बहिण तेजस्वी पवार यांनी दोन वर्षापूर्वी येथिल शाळा व ग्रामपंचायतीच्या भिंती रंगविल्या असून बोलक्या केल्या आहेत. त्यांच्या समोरच भावाच्या कर्तुत्वाचा गौरव म्हणजे जवळवाडीकरांसाठी सुवर्णयोग असल्याचे गौरव उद्गार यावेळी त्यांनी काढले.
सनपाने येथिल फोटोग्राफर व सामान्य शेतकरी कुटुंबातील मधुकर पवार यांचे चिरंजीव ओमकार पवार यांनी यु.पी.एस.सी परिक्षेत घवघवीत यश मिळवित जावली तालुक्यातील पहिला आय.पी.एस.अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या यशाबद्दल जवळवाडीकरांच्या वतीने त्यांचा सत्कार जवळवाडी येथे आयोजीत केला होता.
यावेळी बोलताना ओमकार पवार म्हणाले, मी जि.प. शाळेतच शिकलो असून अभ्यास सुध्दा घरीच केला आहे. पण घरच्यांनी दिलेले बळं व त्यांनी घेतलेले परिश्रम कायम नजरे समोर ठेवले की, यश मिळणे कठीण नसते. आपण सर्व युवकांनी ध्येय निश्चित करा, मी पहिला आय.पी.एस असलो तरी ही सुरवात आहे. आपण सर्वांनी जिद्दीने व ध्येयाने अभ्यास करा, जावळी तालुक्याला अधिकार्यांची जावळी म्हणून नवी ओळख निर्माण करूया. माझ्या बहीणीने रंगवलेल्या शाळेसमोर माझा सत्कार होणे, मी माझे भाग्यच समजतो. ती तिच्या क्षेत्रात नावलौकीक वाढविते आहे, याचा निश्चितच अभिमान आहे.
यावेळी त्यांचे पिताश्री मधुकर पवार, काका संजय पवार, तानाजी पवार, आण्णासाहेब धनावडे, भाऊशेठ जवळ, यशवंत चव्हाण, बाबुराव जवळ, जोतिराम जवळ, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |