सातारा : खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी तेजस उर्फ सोन्या बाळू देशपांडे याचे व आकाश उर्फ लैलीपप्या शिवाजी जाधव वय 25 रा. मोती चौक फलटण, विकास दशरथ जाधव वय 24, राहणार मलटण तालुका फलटण यांना त्यांच्या गाडीतील पेट्रोल मागितल्या वरून शिवीगाळ झाल्याचा राग मनात होता. त्यांनी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास तेजस याला आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण येथून गणपती पाहण्यासाठी चल, असे म्हणून गाडीवर बसवले. त्यानंतर काळुबाई नगर रोड, मलटण येथे घेऊन जाऊन तेथे अनिता अविनाश जाधव वय 26, रा. मलटण, ता. फलटण आणि संतोष दत्तू सस्ते वय 45, रा. मलटण, ता. फलटण यांना बोलावून घेतले. यानंतर या चौघांनीही मिळून तेजस यास शिवीगाळ करीत धमकी देऊन हाताने, पायाने मारहाण करून तसेच चाकूने वार केले. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. सी. मुंडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हा खटला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून फिरोज शेख यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा, अन्य साक्षीदारांच्या साक्षी तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी आकाश उर्फ लैलीपप्या जाधव आणि विकास जाधव या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. अनिता जाधव आणि संतोष सस्ते यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार संजय पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलीस प्राॅसिक्युशन स्काॅड चे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, पोलीस हवालदार गजानन फरांदे, मंजूर मणेर, महिला पोलीस हवालदार रहिनाबी शेख, राजेंद्र कुंभार, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल अमित भरते यांनी मदत केली.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |