03:30pm | Nov 26, 2020 |
सातारा: फलटणकरांच्या पाठीत खंजीर खुपसून बारामतीला पाणी पळवणार्या पक्षाच्या उमेदवाराला स्वाभिमानी फलटणकर मतदान करणार नाहीत, अशा शब्दांत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टिका केली. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख व जितेंद्र दत्तात्रय पवार यांच्या प्रचारार्थ ‘स्वराज रिसॉर्ट’ विंचुर्णी, फलटण येथे पदाधिकारी बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस होते.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राहुल कुल, माजी आमदार राम सातपुते, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, शेखरजी चरेगावकर, विक्रमजी पावसकर, श्रीकांतजी देशमुख व इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, देवेंद्रजी फडणवीस यांनी फलटणकर जनतेला निरा-देवधरचे पाणी पुन्हा फलटणला मिळवून देण्याचा शब्द पाळला होता. परंतु राष्ट्रवादी पक्षाने सत्ता येताच फलटणकर जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून निरा-देवधरचे पाणी बारामतीला पळवले, अशा या पाणी चोरणार्या पक्षाला स्वाभिमानी फलटणकर कदापीही मतदान करणार नाहीत. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना 1 नंबर पसंतीचे मतदान करून भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी मान्यवरांचे स्वागत जिल्हाअध्यक्ष विक्रमजी पावसकर यांनी केले व आभार अनुप सुर्यवंशी यांनी मानले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |