12:55pm | May 04, 2021 |
पुसेगाव: स्वतःचे व्यवसाय बंद ठेऊन येथील 9 फॅब्रिकेटर्स व्यावसायिकांनी पुसेगाव कोविड सेंटरला 9 ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करुन वेंटीलेटरवरील कोविड रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. तहसिलदार किरण जमदाडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन तातडीने या कोविड सेंटरला 9 ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा या व्यावसायिकांनी केला आहे.
पुसेगावचे तलाठी गणेश बोबडे व मंडलाधिकारी किसनराव तोडरमल यांनी सर्व ऑक्सिजन सिलेंडर जमा करुन पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरमध्ये उपलब्ध केले आहेत. पुसेगाव कोरोना सेंटरमध्ये सध्या कोविडचे 88 अॅक्टीव रुग्ण आहेत. तर 12 रुग्ण वेंटीलेटरवर आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने कोरोना महामारीत पुसेगाव कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी व्यवसायासाठी वापरले जाणारे सिलेंडर्स मिळावेत. यासाठी तहसिलदारांनी येथील सर्व 9 फॅब्रिकेटर्सना पत्र देऊन आवाहन केले होते. मानवतेचा विचार करुन आपल्या व्यावसायिक फायद्याचा विचार न करता आपण केलेल्या आवाहनास कृष्णा ग्रो इंडस्ट्रीजचे निखील पोरे, महात्मा फुले वेल्डींग वर्क्सचे चंद्रकांत गोरे, धनवान फॅब्रिकेशनचे आप्पाजी आइंगळे, सेवागिरी फॅब्रिकेशनचे प्रविण नौगण, सदगुरु कृपा मेटल फॅब्रिकेशनचे शिवाजी लोहार, गुरुप्रसाद फॅब्रिकेशनचे केशव सुर्यवंशी, शिवशंभू वेल्डींग वर्क्सचे संजय काटकर, जय हनुमान इंजिनिअरचे गणेश जाधव, येथील सर्व फॅब्रिकेटर्स,धनवान गॅरेजचे संताजी आईंगळे व बबन पोरे याव्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येथील कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करण्याचा मोठा उदात्तपणा दाखवला आहे. पुसेगाव येथील फॅब्रिकेटर्स व्यावसायिकांचा आदर्श घेऊन पुसेगाव परिसरातीलच नव्हे तर खटाव तालुक्यातील अन्य व्यावसायिकांनीही ऑक्सिजन सिंलेडर्स देऊन रुग्णांना नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन तहसिलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |