सातारा : पळसावडे (ता. सातारा) येथे गर्भवती वनरक्षक महिलेला व तिच्या पतीला झालेल्या मारहाणीबाबत पूर्ण चौकशी व तपास करून मुली, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा करा, अशी मागणी बेटी बचाओ बेटी पढाओ भाजपा महाराट्र प्रदेश संयोजक डॉ. सौ. शुभा फरांदे-पाध्ये यांनी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली आहे.
याबाबत बन्सल यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. यावेळी मनीषा पांडे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी हुबळीकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, ओबीसी मोर्चा उपाध्यक्षा संध्या निकुंभ, ओबीसी युवती जिल्हाध्यक्षा वनिता पवार, किरण जाधव, ॲड. रीना भणगे, ॲड. जागृती ससाणे, मनिषा जाधव, विक्रम बोराटे आदी उपस्थित होते.
निवेदनात लिहिले आहे की, पळसावडे (ता. सातारा) येथे गर्भवती वनरक्षक असलेल्या सिंधू बाजीराव सानप या महिलेला व तिच्या पतीला, माजी सरपंच रामचंद्र गंगाराम जानकर व प्रतिभा जानकर (दोघेही रा. पळसावडे) तसेच त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. दि. 17 रोजी सकाळी नऊ वाजता पळसावडे येथे आरोपी प्रतिभा जानकर हिने तक्रारदार सिंधू सानप यांना 'तू कामावरील बायका का घेऊन गेलीस, असे म्हणत थोबाडीत मारत वाद घातला होता. यानंतर दि. 18 रोजी दुपारी पुन्हा संशयित महिलेने फोन करून 'तू वनक्षेत्रात यायचे नाही. आलीस तर मारेन,' असे म्हणत दमदाटी, शिवीगाळ केली. दि. 19 रोजी सकाळी 8 वाजता तक्रारदार व त्यांचे वनरक्षक पती काम करत असताना तेथे संशयित आरोपी पती व पत्नी आले. संशयितांनी पुन्हा वाद घालत थेट तक्रारदार व त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तक्रारदार या गर्भवती असतानाही त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर आरोपी हा वनसंरक्षक समितीमधील समन्वयक असून त्याने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद व निंदनिय आहे. आरोपी यांनी दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी यावेळी दिली.
या घटनेमुळे संतापाची लाट निर्माण झाली असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात मारकुट्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपासाच्या कामी शासकीय सेवा बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या अनुषंगाने जीवे मारण्याचा प्रयत्न. स्त्री गर्भातील अर्भकाचे जीवितास धोका निर्माण होईल वगैरे विषयाच्या अनुषंगाने गंभीर गुन्हा घडलेला आहे. तरी गुन्ह्याचे कामी भारतीय दंड संहिता कलम 307, 353, 354ए, 34 व अन्य आवश्यक कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल होवून आरोपीस कडक शासन व्हावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |