12:31pm | Feb 15, 2023 |
फलटण : तांबमळा फरांदवाडी, ता. फलटण येथे अज्ञात चार ते पाच जणांनी रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राने एकास गंभीर मारहाण केली. यात संबंधित गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13 रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास तांबमळा फरांदवाडी ता. फलटण येथे राहणारे मनीष प्रकाश ओझर्डे (वय 45) हे व त्याची पत्नी घरात झोपले असताना अज्ञात चार ते पाच जणांनी घराबाहेर येवून मनीष प्रकाश ओझर्डे यांना दार उघडून बाहेर येण्यास सांगितले. मनीष प्रकाश ओझर्डे हे घाबरून घराबाहेर आले नाहीत. यानंतर अज्ञात चार ते पाच जणांनी दारावर दगड घालून दार तोडू, अशी धमकी दिली असता मनीष प्रकाश ओझर्डे हे दरवाजा उघडुन घराबाहेर आले. त्यावेळी तोंड बाधून हातात धारधार शस्त्र घेऊन उभे असणाऱ्या अज्ञात चार ते पाच जणांनी मनीष ओझर्डे यांना धारदार शस्त्राने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घरात पत्नी व्यतिरिक्त कोणीही नसल्याने त्यांना वाचवण्यास कोणी आले नाही. या मारहाणीत मनीष प्रकाश ओझर्डे यांना गंभीर मारहाण करत हातावर दोन ठिकाणी गंभीर वार केले. यानंतर आरडाओरडा झाल्याने शेजारील काही अंतरावर राहत असलेल्या काही लोकांनी मनीष ओझर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यामुळे मारहाण करणाऱ्या अज्ञात चार ते पाच जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर शेजारील लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी असलेल्या ओझर्डे यांना रुग्णालयात दाखल केले. जखमी ओझर्डे यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हा हल्ला दरोडा टाकण्याच्या हेतूने की इतर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याची महिती अद्याप मिळाली नसून या घटनेमुळे तांबमळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास करत गंभीर मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी तांबमळा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |