10:58pm | Jul 06, 2020 |
सातारा : कोरोनाच्या चढत्या आलेखामुळे सातारा जिल्ह्यातील जनता हादरून गेली आहे. काल रात्रीपासून ५७ नागरिकांच्या तपासणीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३६१ पर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील हॉटस्पॉट झालेली गावे हबकली असून त्या ठिकाणी कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचवेळी आज जिल्ह्यातील २२ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ३२ जणांच्या तपासणीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये निकट सहवासित २९, प्रवास करुन आलेले १, आयएलआय २ याप्रमाणे रूग्णांचा समावेश आहे. कोरोना बाधितांमध्ये १० ते ६५ वर्षे वयोगटातील १४ पुरुष व १८ महिला आहेत. नवीन बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील जिहे येथील १७ वर्षीय युवक, कोडोली येथील ५८ वर्षीय महिला, नागठाणे येथील ४६ वर्षीय महिला, रेल्वे कॉलनी (क्षेत्र माहुली) येथील ५५ वर्षीय पुरुष, अश्विनी पार्वâ (संगमनगर) येथील ४९ वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील २१ वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील शिर्वेâ कॉलनी, शिरवळ येथील २३ वर्षीय महिला, जुना मोटार स्टँड, शिरवळ येथील ५८ वर्षीय महिला, कराड तालुक्यातील तळबीड येथील ६५ वर्षीय महिला, विद्यानगर येथील ६३ वर्षीय महिला, तारुख येथील ३५ व ७० वर्षीय महिला, १० वर्षाची युवती तसेच १२, १४, १५ वर्षीय युवक, फलटण तालुक्यातील कोळकी येथील २३ व ४५ वर्षीय महिला, गुणवरे येथील ४९ वर्षीय महिला, आंदरुड येथील १४ वर्षीय युवक, वाई तालुक्यातील पसरणी येथील ३१, ३२, ५२ वर्षीय पुरुष, वाई शहरातील ३५ वर्षीय महिला व २८ वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील ३५ व ५२ वर्षीय महिला, जावळी तालुक्यतील मुनावळे येथील २८ व ५६ वर्षीय महिला तसेच ३६, ६५, १२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तसेच आज रात्री उशीरा सातारा तालुक्यातील जिहे येथे १, दौलतनगर येथे १, अपशिंगे येथे १, सातारा शहरात कारागृह येथे ३, रविवार पेठ येथे ३, बुधवार पेठ येथे १, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील ३ कर्मचारी, कोरेगाव तालुक्यातील खडखडवाडी येथे १, चंचळी येथे १, कोरेगाव शहरात २, आसनगाव येथे १, ल्हासुर्णे येथे १, वाई तालुक्यातील आसले येथे १, कराड तालुक्यातील तारुख येथे ३, शामगाव येथे १, येळगाव येथे १ अशा एकूण २५ नागरिकांचा अशा आणखी २५ जणांचे अहवाल बाधित आल्यामुळे आजच्या बाधितांचा आकडा ५७ झाला.
दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून बNया झालेल्या २२ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील ७६, २२, २७, २८, ४८, ५०, २१ व २२ वर्षीय पुरुष आणि २५ व ३० वर्षीय महिला, उंब्रज येथील २६ वर्षीय पुरुष, येळगाव येथील ५३ वर्षीय महिला, बनवडी येथील २९ वर्षीय महिला, चरेगाव येथील ३२ वर्षीय महिला आणि ४ वर्षीय बालक, जखिणवाडी येथील १९ वर्षीय युवक, अमृतवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील ३४ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील धावली (रोहोट) येथील ४५ वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील येळीव येथील ७६ वर्षीय महिला आणि २४ व २६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १३६१ वर गेला असून ८१३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ५५ इतकी झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |